राज्यात दुध उत्पादनास चालना देण्यासाठी ०६ Dudhal janvara vatpa संकरित गायी / म्हशींचे गट वाटप करणे या नाविन्यपुर्ण राज्यस्तरीय सर्वसाधारण, अनुसुचित जाती उपयोजना व आदिवासी क्षेत्र उपयोजनेंर्तगत योजनेस वाचा येथील दि.०१.०७.२०११ व दि.३१.०१.२०१३ च्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मंजुरी प्रदान करण्यात आलेली आहे.
- ही पण बातमी वाचा टप्प्याटप्प्याने सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होईल
सदर योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करून ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याची
बाब शासनाच्या विचाराधीन होती.
त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणी संदर्भात वाचा येथील दि. ०१.०७.२०११ व दि. ३१.०१.२०१३ रोजी निर्गमीत केलेले दोन्ही शासन निर्णय अधिक्रमित करून,
खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
Dudhal janvara vatpa
राज्यात दुग्धोत्पादनास चालना देण्यासाठी सहा/चार/दोन संकरीत गाई/म्हशींचे गट वाटप करणे या नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय योजनांतर्गत योजनेस (सर्वसाधारण/ अनुसूचित जाती उपयोजना/ आदिवासी उपयोजने अंतर्गत) याद्वारे, शासनाची प्रशासकीय मंजूरी प्रदान करण्यात येत आहे. सदरची योजना खालील सविस्तर तपशिलानूसार राबविण्यात यावी.
