crop insurance / हेक्टरी 5000 हजार रुपये मिळणार

शेतकऱ्यांना रु.५००० प्रति हेक्टर अग्रीम महिनाभरात सर्व मंडळांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील !जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने प्रचंड ओढ दिल्याने सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट दिसून येत आहे. खरिपातील मुख्य नगदी पिकेच अडचणीत येत असल्यामुळे शेतकरी अत्यंत  चिंताग्रस्त असून बळीराजाला दिलासा देण्यासाठी महिनाभरात अग्रीम विम्यापोटी किमान रु. ५००० प्रती हेक्टरी सर्व मंडळांना मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील crop insurance आहोत.उत्पादनामध्ये प्रचंड घट होतेय हे गृहीत धरून प्रधानमंत्री पिक विमा योजनेतील निकषाच्या पुढे जाऊन या परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत करणे अनिवार्य आहे.

त्यामुळे महिनाभरात पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना २५% अग्रिम मिळवून देण्यासाठी प्रयत्न राहणार आहे.पिकांची परिस्थिती लक्षात घेऊन मागील आठवड्यामध्ये जिल्हाधिकारी यांना केलेल्या सूचनेप्रमाणे जिल्हा सनियंत्रण समितीची बैठक झाली असून २५ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील ११ महसूल मंडळातील नुकसानीचा अहवाल देण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. २१ दिवसांपेक्षा अधिकच्या पावसातील खंडामुळे जिल्ह्यातील इतर महसूल मंडळे देखील निकषाप्रमाणे अग्रीम नुकसान भरपाईसाठी अधिसूचित करण्यात येतील. यामध्ये आज आणखीन १३ मंडळाची भर पडली आहे.#पिक #शेती #शेतकरी #विमा #धाराशिव #crop #farming #farmers # #dharashiv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *