Banana Crop Insurance हवामानावर आधारित फळपिक विमा योजना – केळी पिक विमा (सन २०२२) अंतर्गत प्रलंबित असलेल्या केळी पिक नुकसान भरपाई बाबत मुख्य सांख्यिकी, कृषि आयुक्तालय, पुणे यांच्या समवेत चर्चा करून प्राप्त माहितीनुसार
Banana Crop Insurance eligible district
जळगाव जिल्ह्यातील केळी पिक पडताळणी झालेल्या अंदाजित ५५,००० हेक्टर क्षेत्रावरील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना अंदाजित रू.३८५ कोटीची नुकसान भरपाई येत्या ४-५ दिवसात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार असून पडताळणी झालेल्या (५५,००० हेक्टर) वरील शेतकऱ्यांची कुठलीही फेर पडताळणी होणार नसून नुकसान भरपाई अदा करण्यात येणार आहे.उर्वरित राहिलेले क्षेत्र अंदाजित २७,००० ते २८,००० हेक्टर बाबत राज्य शासनास पुढील कार्यवाहीसाठी अहवाल सादर करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी प्रत्यक्ष शेतकऱ्यांसह बैठक घेऊन ई पिक पाहणी पेरणी अहवाल अंतिम ग्राह्य धरून तसेच पिक पडताळणीची मुदत विमा काढल्यापासून ४५-६० दिवस असून देखील पात्र विमाधारक शेतकऱ्यांना विमा कंपनीच्या चुकीमुळे पडताळणी पूर्ण न झाल्याने नुकसान भरपाई पासून वंचित राहाववे लागत
असल्याची बाबत राज्य सरकारच्या निर्दशनास आणून उर्वरित सर्व शेतकऱ्यांना केळी नुकसान भरपाई देण्याबाबत देखील पाठपुरावा करणार आहे.प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत राज्य सरकारने लागू केलेल्या सर्व समावेशक पिक विमा योजनेतील हंगामातील प्रतिकूल परिस्थिती मध्ये जळगाव जिल्ह्यातील 7 तालुक्यातील पात्र 27 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना 25% आग्रीम नुकसान भरपाई बाबत माहिती अमळनेर

:अमळगाव,अमळनेर,भरवसमारवड, नगाव, पतोंडा, शिरुड, वावडेभडगाव :भडगाव, कजगाव, कोळगावधरणगाव :धरणगाव, सोनवदचाळीसगाव :चाळीसगाव, बहाळ, हातले,खडकी, मेहूनबारे,शिरसगाव, तळेगावयावल :फैजपूर, भालोद, बामनोद Banana Crop Insurance