२ हेक्टर वरून वाढवत ३ हेक्टर करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय / Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2023

Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2023 शेतकऱ्यांना मिळाला मोठा दिलासा नुकसानीची मर्यादा २ हेक्टर वरून वाढवत ३ हेक्टर करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय.आ डॉ संजय कूटे यांच्या पाठपुराव्यास यश२२ जुलै २०२३ रोजी जळगाव जामोद मतदारसंघासह विदर्भात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेती पिकांचे तसेच शेतजमीन व नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन बळीराजा अतिशय मोठ्या संकटात सापडला होता.  मदतीचे निकष २ हेक्टर पर्यंत असल्याने अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार असल्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शास आणून देत मदतीचे निकष बदलवून २ हेक्टर ऐवजी ३ हेक्टर करण्याची विनंती केली होती, या विनंतीचा सकारात्मक विचार करून मंत्रिमंडळाने मदतीचे निकषामध्ये बदल करून ३ हेक्टर पर्यंत मदत देण्याचा मोठा निर्णय आज घेतला आहे.

जून – जुलै 2023 या कालावधीत अतिवृष्टमुळे  मोठ्या प्रमाणात पाउस होऊन पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यभरात शेती पिकांचे व शेत जमिनीचे प्रचंड नुकसान झाले होते. या नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांना तात्काळ आर्थिक मदत मिळण्यासाठी सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री व मदत व पुनर्वसन मंत्री यांचे कडे सतत पाठपुरावा सुरु ठेवला होता, त्यामुळे सदर शासन निर्णय हा 3 ऑक्टोंबर पर्यंत काढण्याचा निश्चय केला होता त्यानुसार यश मिळून तसा शासन निर्णय ३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता.  सदर शासन निर्णय बघितल्यावर मदतीचा निकष हा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठीच २ हेक्टर पर्यंत असल्याने त्यापेक्षा जास्त बाधित क्षेत्र असलेले शेतकरी बांधव मदतीपासून वंचित राहनार होते याबाबत स्थानिक प्रशासकिय अधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन माहिती घेतली असता अश्या प्रकारे बाधित शेतकऱ्यांची संख्या मतदारसंघात २८०० असल्याचे निदर्शनास आले अश्या शेतकरी बांधवांना मदत हि अत्यंत कमी प्रमाणात मिळणार होती, 

नुकसान भरपाई यादी

हि बाब राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्यासोबत चर्चा करून लक्षात आणून दिली व शासन निर्णयात बदल करण्याची विनंती केली होती.याबाबत विशेषतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत हा विषय राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेत मदतीचे निकष बदलवून २ हेक्टर एवजी ३ हेक्टर केले आहेत अशी घोषणा करून जळगाव जामोद मतदारसंघासह राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे तसेच ज्या शेतकरी बांधवांची काही जमीन खरडून गेली व इतर शेतीमध्ये पिकाचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले यापैकी एकच मदत दि.३ ऑक्टोबरच्या शासन निर्णयानुसार देय होती परंतु आज घेतलेल्या मंत्रीमंडळाच्या निर्णयामुळे खरडून गेलेली शेती व त्या शेतीमध्ये झालेले पिकांचे नुकसान या दोन्ही बाबींवर जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यासह राज्यातील शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे. तसेच ज्या शेतकरी बांधवांची शेती खरडून गेलेली आहे त्या संपूर्ण शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे.मतदारसंघातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नरत असताना ३ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार एक हजार ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून यामध्ये २ हेक्टर एवजी ३ हेक्टर पर्यंत विदर्भासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा विषय मार्गी लागल्याचा मनस्वी आनंद आहे.

मदतीच्या निकषांमध्ये बदल केल्यामुळे मतदारसंघातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीचे अतिरिक्त ३५ ते ४० कोटी रुपये मिळणार असल्याचा आनंद आहे.शासन निर्णयात बदल केल्यामुळे आता स्थानिक प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे, प्रशासनाने सर्वच शेतीचे पंचनामे आधीच केले असून मदतीचे निकष बदलण्यात आले असल्यामुळे प्रशासनाने तत्परतेने वाढीव मदत मिळवून देण्यासंदर्भात नवीन मदतीच्या निकषांच्या अनुषंगाने नुकसानीचे पंचनामे शासनाकडे अपलोड करण्यासाठी तत्परतेणे कार्य करावे.

दिवाळीपूर्वीच शेतकरी बांधवांना आर्थिक मदत मिळावी यासाठी माझे प्रयत्न असून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा माझा मानस आहे.त्यासाठी माझा अविरत पाठपुरावा सुरु आहे व यापुढेही शेवटच्या बाधित शेतकरी बांधवाला मदत मिळवून देण्याचे माझे ध्येय आहे तसेच प्रशासनातील अधिकारी वर्गाने सुद्धा शेतकऱ्याप्रती संवेदना ठेऊन तातडीने आजच्या शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करत शेतकरी बांधवांना दिवाळीआधी मदत मिळवून द्यावी.  Ativrushti Nuksan Bharpai Yadi 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *