शेतकऱ्यांना मिळणार 3 लाख रुपये कर्ज ( Agriculture Loan )

Agriculture Loan : शासन निर्णय क्रमांक १ अन्वये राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना ६% व्याज दराने अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा होण्यासाठी शासकीय अर्थसहाय्याचा निर्णय घेतलेला आहे.

या निर्णयानुसार, केंद्र शासनाचे धोरणानुसार बँका ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना ७% व्याज
दराने कर्ज पुरवठा करणार आहेत, त्या ठिकाणी बँकांनी ७% ऐवजी शेतकऱ्यांना ६% व्याज दराने
कर्ज पुरवठा करावा, असे राज्य शासनाचे धोरण आहे. या प्रयोजनासाठी १% व्याज फरकाच्या
रक्कमेचा आर्थिक भार शासनावर आहे.

20240108 193019 1

सन २००६-०७ पासून खरीप व रब्बी हंगामामध्ये
राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँका व सन२०१३-१४ पासून शेतकऱ्यांना रूपये ३.०० लाखापर्यंत अल्प मुदत पीक कर्ज वाटप करणाऱ्या

खाजगी बँकांना या निर्णयाचा लाभ देण्यात येत आहे.

सन २०२३-२४ या चालू आर्थिक वर्षासाठी शेतकऱ्यांना अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा
करण्यासाठी १ टक्का दराने अर्थसहाय्य योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याची बाब
शासनाच्या विचाराधीन होती.

पीकविमा

सन २०२३-२४ वर्षात शेतकऱ्यांना अल्प मुदत पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी १ टक्का
दराने अर्थसहाय्य योजनेअंतर्गत (२४२५१५०१) ३३ अर्थसहाय्य खाली
अर्थसंकल्पीत निधी वितरणासाठी उपलब्ध आहे. त्यापैकी रु.२४०.००
वितरण वाचा क्र. ४, रू. ४८०.०० लाख निधीचे वितरण वाचा क्र. ५ व रू. २४०.०० लाख
निधीचे वितरण वाचा क्र. ६ येथील शासन निर्णयांन्वये करण्यात आले आहे. तसेच आता
नियोजन व वित्त विभागाच्या मान्यतेने अर्थसंकल्पीय तरतूदीच्या ७०% म्हणजेच रू.
७२०.०० लाख (रू. सात कोटी वीस लाख) निधीचे वितरण करण्यास या शासन निर्णयान्वये
मान्यता देण्यात येत आहे.
२. तपासणी सूचीप्रमाणे सर्व बाबींवी सदर
प्रकरणी पूर्तता होत आहे.

https://yojana.aamhishetkaree.com/solar-generator-price/


३. वरीलप्रमाणे मंजूर करण्यात आलेला निधी संबंधित बँका / संस्थांस वितरीत करताना
आहरण व संवितरण अधिकारी यांनी सदर रकमेबाबत उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त करून
घ्यावे व त्याची प्रत शासनास सादर करावी.
४. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य कार्यालयाने वित्त
विभागाच्या उपरोक्त वाचा क्र.३ येथील शासन परिपत्रकातील सूचनांचे पालन करावे.
५. सदर तरतूद संबंधित संस्थांना अदा करण्यासाठी V०००४ सहायक निबंधक
(अर्थसंकल्प आणि नियोजन), आयुक्त, सहकार, पुणे यांना नियंत्रक अधिकारी म्हणून
घोषित करण्यात येत आहे. तसेच लेखाधिकारी, अधिन सहकार आयुक्त व निबंधक,
सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित
करण्यात येत आहे. सदर निधी आहरण करून हा खर्च किती वेळेत होईल, हे सहकार
आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी पहावे. तसेच याबाबतचा
अहवाल व विकास मंडळनिहाय खर्चाची माहिती वेळो वेळी शासनास पाठवावी.


Agriculture Loan : सदरहू रक्कम मागणी क्र.व्ही २ मुख्यलेखाशिर्ष ” २४२५ सहकार (१०७), सहकारी
पत संस्थांना सहाय्य (०१) (१०) शेतकऱ्यांना अल्पमुदती पीक कर्ज पुरवठा करण्यासाठी १%
व्याज दराने अर्थसहाय्य (कार्यक्रम ) ( दत्तमत) (२४२५१५०१) ३३ अर्थसहाय्य “, या
लेखाशिर्षाखालील सन २०२३-२४ या वर्षासाठी उपलब्ध असलेल्या तरतूदीमधून सदर
रक्कम खर्च करण्यात यावी.
पृष्ठ ३ पैकी २

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *