Pocra / या योजनेचे 265 कोटी मंजूर थेट बँक खात्यात जमा होणार

३. नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प कार्यालयाचे पत्र
Pocra:- हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील ४२१० गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपाण पट्ट्यातील ९३२ गावे अशा एकूण ५१४२ गावांमध्ये ६ वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे रू. ४००० कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता संदर्भ क्रमांक २ येथील शासन निर्णयांन्वये सन २०२१-२२ मध्ये एकूण रु.४५२.४३ कोटी निधी उपलब्ध करुन देण्यात आली असून सदर निधी खर्ची पडलेला आहे.

खालील लिंक वर क्लीक करून Pocra

ही पण बातमी वाचाआली रे नुकसान भरपाई यादी

प्रकल्पांतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनी, शेतकरी गट/कंपन्यांनी व ग्राम कृषि संजीवनी समितीने केलेल्या कामापोटी द्यावयाच्या अर्थसहाय्यासाठी ३३ अर्थसहाय्य या उद्दिष्टकरिता बाहय हिस्सा व राज्य हिस्सा असा एकूण रु.२५० कोटी अतिरिक्त निधी पुरवणी मागणीद्वारे उपलब्ध करुन दिला आहे. सबब, प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी सदर रु.२५० कोटी निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे :-

शासन निर्णय:
१. सन २०२१-२२ करिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना प्रकल्पांतर्गत विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता ३३-अर्थसहाय्य या उद्दिष्टाकरिता रु.२५० कोटी (रु.दोनशे पन्नास कोटी फक्त) निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरीत करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

मतदान यादी इथे क्लीक करून पहा

२. उपरोक्तप्रमाणे नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पाकरिता बाहय हिश्श्याचा रु. २१० कोटी
(रु.दोनशे दहा कोटी फक्त) व राज्य हिश्श्याचा रु. ४० कोटी रुपये चाळीस कोटी फक्त) निधी वितरीत करण्यात येत असून तो प्रकल्पाच्या पुढील लेखाशिर्षाखाली सन २०२१-२२ मध्ये अर्थसंकल्पीत केलेल्या तरतुदीतून खर्ची टाकावा.

३. या शासन निर्णयाद्वारे उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या रु.२५० कोटी (रु.दोनशे पन्नास कोटी फक्त) निधीचे कोषागारातून आहरण व वितरणाकरिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना नियंत्रक अधिकारी आणि वित्त विशेषज्ञ, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे.

४. प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांनी ३३-अर्थसहाय्य या उद्दिष्टशीर्षाखाली खर्च झालेल्या रक्कमांचे उपयोगिता प्रमाणपत्र वेळोवेळी शासनास सादर करावे. ल्प संचालकांनी सदर प्रकल्पांतर्गत खर्ची पडणाऱ्या निधीची जागतिक बँकेकडून सत्वर प्रतिपूर्ती 1/3 वी व मिळालेल्या प्रतिपूर्तीबाबत शासनास वेळोवेळी अहवाल पाठवावा. पापल्प संचालकांनी प्रकल्पांतर्गत झालेल्या कामाचा प्रगती अहवाल शासनास वेळोवेळी सादर करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *