शासन निर्णय

या योजने मिळणार शेळी साठी अनुदान

Written by aamhishetkaree

मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर पहिल्या टप्यात उस्मानाबाद, यवतमाळ, गोंदिया व सातारा आणि दुस- या टप्यात बीड व भंडारा या जिल्ह्यांमध्ये २० शेळ्या+२ बोकड असा शेळी गट वाटप करणे ही योजना सन २०१७-१८ पासून राबविण्यास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्याबाबत…

.महाराष्ट्र शासन प्रस्तावना:- पशुंसवर्धन विभागामार्फत शेळी गट वाटपाच्या राज्यस्तरीय नावीन्यपूर्ण व जिल्हा स्तरीय योजनेमधील शेळ्या आणि बोकडाची / मेंढ्या आणि नर मेंढ्याची आधारभूत किंमत वाढविण्यास दि.१२.०५.२०२१ रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाने मान्यता प्रदान केलेली आहे.

ही पण बातमी वाचा शेळीपालनसाठी मिळणार 250000 लाख रुपये

त्यानुषंगाने खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे. शासन निर्णय:- वाचा क्र.१ येथील दि.१६.११.२०१७ च्या शासन निर्णयातील पृ.क्र.२ वरील योजनेअंतर्गत देय अनुदान खालीलप्रमाणे वाचावे. योजनेंतर्गत देय अनुदान निवड झालेल्या प्रत्येक लाभार्थीला वाटप करणे प्रस्तावित असलेल्या शेळी गटाचा एकूण अपेक्षित खर्च (शेळी गट व शेळयांसाठीचा वाडा) रू. २,३१,४००/- इतका आहे.. गटाची स्थापना करताना सुरुवातीला लाभार्थ्यास १०० टक्के निधी स्वहिस्सा / वित्तीय संस्थांचे कर्ज याद्वारे उभा करावयाचा आहे. सर्व प्रवर्गासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या ५० टक्के तथापि, प्रति गट कमाल मर्यादा रू. १,१५,७००/- या प्रमाणे अनुदान (Back ended Subsidy) देय राहील.

About the author

aamhishetkaree

Leave a Comment