PMFBY Beneficiary List 2022 / बँक खात्यात जमा होणेस सुरवात

७ नव्हे तर ७०० दिवसांच्या संघर्षाला यश.. PMFBY Beneficiary List 2022 पिक विमा जमा होण्यास सुरुवात !

धाराशिव जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना तब्बल २ वर्षाच्या संघर्षानंतर, लढ्यानंतर प्रचंड यश मिळून ऐतिहासिक लाभ मिळायला सुरुवात झालेली आहे. खरीप-२०२० मध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांची मोठी हानी झाली होती. ठाकरे सरकारमधील अनेक नेते मंडळींनी पाहणी करूनही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले होते.

केवळ २०% शेतकऱ्यांनाच पिक विम्याची नुकसान भरपाई मिळाली व ८०% म्हणजे जवळपास ३.५ लाख शेतकरी हक्काच्या नुकसान भरपाई पासून वंचित राहिले होते. हा लढा ७ दिवसाचा नव्हे तर ७०० पेक्षा अधिक दिवसांचा होता.

गेल्या २ वर्षांपासून आपण सातत्याने पाठपुरावा करत आहोत. सुरुवातीला ठाकरे सरकारकडे बैठक लावून यातून मार्ग काढण्याची विनंती केली. मात्र पिक विम्यासाठी कार्यालय फोडणाऱ्या शिवसेनेच्या नेत्यांनी साधी बैठकही घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मा.उच्च न्यायालयात जावे लागले. ॲड.श्री.वसंतराव साळुंखे यांच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने न्यायालयासमोर वास्तविक बाजू मांडली.

मा.उच्च न्यायालयाने ३.५ लाख शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरपाई देण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. त्यानंतर ठाकरे सरकारने मा.सर्वोच्च न्यायालयामध्ये कॅव्हिएट दाखल करणे अभिप्रेत होते, मात्र तेही न केल्याने शेतकऱ्यांच्या वतीने कॅव्हिएट दाखल करण्यात आले.

कॅव्हिएट दाखल केल्यामुळे पिक विमा कंपनीला थेट स्थगिती मिळाली नाही. शेतकऱ्यांच्या वतीने २५० कोटी रुपये भरून सुनावणी घ्यावी अशी विनंती मा.सर्वोच्च न्यायालयात आपण केली व मा.न्यायालयाने २०० कोटी रुपये जमा करून घेतल्यानंतर मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली. त्या अनुषंगाने विमा कंपनीने २०० कोटी रुपये मा.सर्वोच्च न्यायालयात जमा केले.

अंतिम सुनावणीच्या आधीच हे पैसे तातडीने शेतकऱ्यांना वितरित करा अशी आपण मागणी केली होती, परंतु मा.न्यायालयाने अंतिम सुनावणी लवकर ठेऊन सर्व म्हणजेच ३.५ लाख शेतकऱ्यांना तातडीने पैसे देण्याच्या बाबतीत आदेश दिले आणि न्यायालयातील जमा असलेले २०० कोटी रुपये व्याजासह जिल्हाधिकाऱ्यांना उपलब्ध करून देण्याचे आदेश देखील दिले.

या रकमेचे काल पासुन जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वाटप होत असून ३ लाख ५१,००० शेतकऱ्यांना हे साधारण २०१ कोटी रुपये ६६३९ प्रति हेक्टर प्रमाणे वाटप होत आहेत, ते खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

Gopinath munde shetkari apghat vima /गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

धाराशिव येथील सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे आणि या निकालाचा फायदा पूर्ण देशामध्ये होणार आहे. आपल्या राज्यात देखील अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असूनही दुर्दैवाने लाखो शेतकऱ्यांना अशा पद्धतीची मदत न मिळाल्यामुळे त्यांना हक्काच्या पीक विमा नुकसान भरपाई पासून वंचित राहावे लागले आहे.

PMFBY Beneficiary List 2022

आता निघालेला आदेश आणि आताच्या राज्य सरकारच्या माध्यमातून झालेल्या अंमलबजावणी मुळे इतर जिल्ह्यात देखील याच पद्धतीने मार्गदर्शन करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे. शेतकऱ्यांनी उभ्या केलेल्या आपल्या लढ्याला यश मिळाल्याचे समाधान वाटते. पुढील जवळपास ३३० कोटी रुपयांसाठी व २२% व्याजासाठी आपला लढा सुरूच राहणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *