Perni antar aani biyanyache praman /पेरणी अंतर आणि बियाण्याचे प्रमाण

प्रस्तावना :-Perni antar aani biyanyache praman 
कडधान्य पिकामध्ये अल्पावधीत तयार होणारे खरीप हंगामातील उडीद हे ७० ते ७५ दिवसात येणारे पिक हे महाराष्ट्र
राज्याचे महत्वाचे पिक आहे. हे पिक थोड्याशा पावसाचा देखील लाभ उठवू शकते. दुबार तसेच मिश्र पीक पध्दतीसाठी हे पिक
अतिशय महत्त्वाचे आहे.
महाराष्ट्रात या पिकाखाली सुमारे ३.५ लक्ष हेक्टर क्षेत्र आहे. हे पिक हमखास पाऊसमानाच्या प्रदेशात, भारी कसदार
काळ्या जमिनीत खरीप हंगामात अल्पवाधीचे पिक म्हणून घेतले जाते. विविध पिक पद्धतीत उडीद पिकाचा समावेश केल्याने
जमिनीचा पोत टिकून, तो सुधारण्यास सुद्धा मदत होते. उडीद पिकाला पाणी कमी लागत असल्यामुळे आणि पर्यायाने पाण्याचा
वापर कमी झाल्याने जमीन चोपण अथवा पाणथळ होण्यापासून वाचविता येते. या पिकाच्या मुळावरील गाठीतील रायझोबियम
जीवाणू हवेतील नत्र शोषून घेत असल्यामुळे या पिकाची नत्राची गरज मोठ्या प्रमाणात परस्पर भागविली जाते. शिवाय या
पिकानंतर घेण्यात येणाऱ्या पिकासाठी उत्तम बेवड तयार होते आणि जमिनीचा कस सुधारण्यास मदत होते.
उडदामध्ये साधारणतः २० ते २५ टक्के प्रथिने असतात आणि हि प्रथिने तृणधान्यातील प्रथिनांना पूरक असल्याने त्यांचा
रोजच्या आहारात पुरेशा प्रमाणात समावेश करणे आवश्यक आहे. गेल्या दोन दशकात उडदाचे उत्पादन आणि उत्पादकता यात
वाढ झालेली आहे. असे असले तरी वाढत्या लोकसंख्येनुसार उडदाची मागणी फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याबाबतीत
महाराष्ट्रातील उत्पादन आणि उत्पादकता वाढवायची असेल तर सुधारित पद्धतीने उडीद पिकाची लागवड करणे गरजेचे आहे.
कोणत्याही पिकापासून जास्तीत जास्त उत्पादन काढायचे असेल तर प्रामुख्याने अधिक उत्पादन देणाऱ्या वाणाची निवड, योग्य
प्रकारच्या जमिनीची निवड आणि पूर्वमशागत, बियाण्याचे प्रती हेक्टर पुरेसे आणि योग्य प्रमाण, वेळेवर पेरणी, रासायनिक खतांचा
शिफारशीत प्रमाणात वापर, वेळेवर तन नियंत्रण, आवश्यकतेनुसार वेळेवर पाणीपुरवठा, रोग व किडींचे प्रभावी नियंत्रण या
बाबींना अनन्यसाधारण महत्व आहे.

हवामान-Perni antar aani biyanyache praman 
> कडधान्य पिके सरासरी ७५० ते १००० मी.मी. वार्षिक पर्जन्यमानात
चांगली येतात.
> उडीद पिकास २१ ते ३५ अंश सें.ग्रे. तापमान चांगले मानवते.
→ फुले येण्याच्या आणि शेंगा भरण्याच्या कालावधीत कोरडे हवामान
पिकाला अधिक उपयुक्त असते.
पूर्वमशागत:
> अगोदरच्या हंगामात घेतलेल्या पिकाचे जमिनीवर पडलेले अवशेष, पालापाचोळा वेचून घेऊन जमिन
स्वच्छ करावी.
→ उडीद हे कडधान्य मध्यम ते भारी जमिनीत घेतले जात असल्याने जमिनीची खोल नांगरट नंतर २
कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.

पेरणीची वेळ : Perni antar aani biyanyache praman 
वेळेवर पेरणीस अतिशय महत्व आहे.
मान्सूनचा पहिला पेरणीयोग्य पाऊस झाल्यावर आणि जमिनीत वापसा येताच, म्हणजे
जूनचा दुसरा आठवडा ते जुलैचा पहिला आठवडा या दरम्यान खरीप कडधान्याची
पेरणी पूर्ण करावी
– उशिरा पेरलेल्या पिकालाही लवकर पेरलेल्या पिकाबरोबर फुले येतात आणि
त्याच्या कायिक वाढीस पुरेसा अवधी मिळत नाही.
> त्यामुळे पिकाची वाढ कमी होऊन फांद्या कमी येतात. तसेच फुले आणि
शेंगांची संख्या कमी होते आणि उत्पादनात घट येते.

बियाण्याचे प्रमाण आणि पेरणी अंतर :-
– हेक्टरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात असणे साठी प्रती हेक्टर बियाण्याचे प्रमाण पुरेसे वापरणे महत्वाचे ठरते.
उडीद पिकाकरीता १५ ते २० किलो प्रती हेक्टर बियाणे वापरावे.
– दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. व दोन रोपांमध्ये १० सें.मी. अंतर ठेऊन पेरणी करावी.
बीजप्रक्रिया आणि जीवाणू संवर्धन :-
– बियाण्याची उगवण चांगली होण्यासाठी आणि रोपावस्थेत बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रती किलो बियाण्यास
२ ग्राम थायरम + २ ग्राम कार्बेन्डाझीम या बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत पर्मनंट भरती | MSC Recruitment | MSC Bank Junior Officer Recruitment


जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा ४ ग्राम प्रती किलो बियाणे याप्रमाणात लावावे.
– यानंतर नत्र स्थिर करणारे रायझोबियम जापोनिकम व स्फुरद विरघळवणारे पीएसबी जीवाणू संवर्धन प्रत्येकी २५ ग्राम प्रती किलो
बियाण्यास लावावे.
– १० किलो बियाण्यास २५० ग्राम वजनाच्या एका पाकिटातील संवर्धन गुळाच्या थंड द्रावणातून चोळावे.
– गुळाचे द्रावण तयार करण्यासाठी एक लिटर पाण्यात १२५ ग्राम गुळ घेऊन तो विरघळेपर्यंत पाणी कोमट करावे.
बीजप्रक्रियेत प्रथम रासायनिक प्रक्रिया केल्यानंतरच जैविक बीजप्रक्रिया करावी.

– यामुळे उडीदाच्या मुळांवरील ग्रंथींचे प्रमाण वाढून हवेतील नत्र अधिक प्रमाणात शोषून घेऊन पिकास उपलब्ध केला जातो.

 

ही पण बातमी वाचानोकरी साठी अर्ज करा


कृषी विभाग, महाराष्ट्र शासन
खते
– चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट १० ते १५ गाड्या प्रती हेक्टर प्रमाणे पेरणी अगोदर शेवटच्या
कुळवणीच्या वेळी पसरावे. यामुळे ते जमिनीत चांगले मिसळले जाते.
– पेरणी करताना उडीद पिकास २० किलो नत्र आणि ४० किलो स्फुरद प्रती हेक्टर या प्रमाणात द्यावे
कृषी विभाग, महाराष्ट्र शासन
आंतरमशागत:
पिक मरतातीपासनच तणविरहीत तोही पिकाच्या जोमदार ताटीसाठी आवश्यक बाब आहे

काढणी, मळणी आणि साठवण:
→ उडीदाच्या शेंगा तोडण्याची गरज भासत नाही.उडीदाच्या शेंगा वाळल्यावर कापणी करून खळ्यावर आणून त्याची मळणी
करावी. शेंगा खळ्यावर चांगल्या वाळल्यावर काठीच्या सहाय्याने झोडपून दाणे अलग करावेत.
→ साठवणीपुर्वी उडीद ५ ते ६ दिवस उन्हात वाळवुन पोत्यात किंवा कोठीत साठवावे.
→ साठवण कोंदट किंवा ओलसर जागेत करू नये.
> शक्य झाल्यास धान्यास १ टक्का करंज किंवा एरंडीचे तेल चोळावे किंवा कडुनिंबाचा पाला (५ टक्के) धान्यात मिसळून धान्य साठवावे.
उत्पादनः→ उडीदाचे १० ते १२ क्विटल प्रती हेक्टर प्रमाणे उत्पादन मिळ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *