जमीन मोजणीसाठी घरातूनच करा अर्ज ( Land Survey )

Land Survey : अनेकदा जमिनीच्या मालकीवरून वाद निर्माण होतात. अशावेळी दोन्ही जमीनमालक भूमी अभिलेख कार्यालयात जाऊन जमिनीची मोजणी करतात. मात्र, याकरिता त्यांना बराच त्रास सहन करावा
लागत होता. अनेकदा कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत होत्या.

आता कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज नसून, घरात बसून अर्ज करून जमिनीची मोजणी करता येणार आहे. शेतजमिनीच्या हद्दीबाबत  निर्माण झाल्यास शेतकरी भूमिअभिलेख विभागाच्या तालुका स्तरावरील उपअधीक्षक भूमिअभिलेख किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्या कार्यालयात ऑनलाइन आणि घरबसल्या अर्ज करू शकता येणार आहे.

1001617151
Land Survey
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या संकेतस्थळावर करा अर्ज या अर्जाचा नमुना सरकारच्या ‘bhumiabhilekh.maharashtra.gov.in
वेबसाइटवर उपलब्ध आहे. शंका, तक्रारी, जमीन मोजणीसह अन्य सुविधांसाठी करता येणार आहे. कागदपत्रे काय लागणार?

अर्ज फी, कोर्ट फी स्टँप, 7/12  उतारा किंवा आखीव पत्रिकेचा उतारा, मोजणी फी भरण्याबाबतचे चलन, मोजणी करावयाच्या जमिनीचा अंदाजे नकाशा, अगर
जमिनीच्या कोणत्या बाजूबाबत हद्दीची तक्रार व कोणत्या बाजूची हद्द काय करून पाहिजे याचा तपशील या कागदपत्रांची गरज भासणार आहे.

पीकविमा

डिजिटल नकाशे मिळणार नव्या प्रणालीनुसार कागदी नकाशे बंद करण्यात येणार आहे. यानंतर डिजिटल
नकाशे मिळणार आहे. हे नकाशे शेतकरी किंवा संबंधित जमिनीचे मालक यांना ऑनलाइन बघायला मिळणार आहे. शेतकरी गावातील सेवा केंद्रात, घरातील संगणकावर किंवा मोबाइलवर डिजिटल नकाशे बघू शकणार आहेत. शेतकयांसाठी हे सोयीचे होणार आहे.
अडीच महिन्यांत अनेक अर्ज गत अडीच महिन्यात जमीन मोजणीसाठी अनेकांनी अर्ज केले आहेत.

Land Survey : यापैकी काहींच्या जमिनीची मोजणीही करण्यात आली आहे. तसेच उर्वरित
अर्जानुसार मोजणी करण्याची प्रक्रिया सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *