Kon Aahet Panjabrav dkh / कोण आहेत पंजाब डख पाटील ?

Kon Aahet Panjabrav dkh हवामानाच्या अंदाजावर अचुक पावसाचा अंदाज सांगणारे पंजाबराव डख कोण आहेत? काही मिनिटांत ३ कोटी लोकांपर्यंत पोहचतो हवामानाचा मोफत अंदाज अंबाजोगाई । प्रतिनिधी गेली अनेक वर्षापासून हवामान खात्याचे अचुक अंदाज सांगुन सर्वांचे लक्ष वेधून घेणारे पंजाबराव डक हे नेमके कोण आहेत याची माहिती आपण जाणुन घेणार आहोत.

ही पण बातमी वाचा या शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा

हवामानाचा अंदाज सांगुन शेतकऱ्यांना जागृत करून त्यांचे नुकसान टाळण्यासाठी कोणाकडुनही कसलेही मानधन न घेता अवघ्या काही मिनिटांत ३ कोटी लोकांपर्यंत हवामानाचा अंदाज सांगणारे पंजाबराव इख हे आज कोट्यावधी शेतकऱ्यांचे हितचिंतक बनले आहेत. शेती आणि हवामानाचा अचुक अंदाज वर्तवणारे पंजाबराव डक यांनी शिक्षण विषयातील सीटीसी आणि एटीडीएनसीपीसी हे अभ्यासक्रम पुर्ण केले आहेत. त्यामुळे गावातील शाळेत अंशकालीन शिक्षक आहेत. केवळ दोन तास ज्ञानदानाचे काम करणे बंधनकारक असलेले पंजाबराव डस हे आपला बहुतेक वेळ हा शाळेतील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी घालवतात. याच शाळेच्या स्थानिक व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा म्हणून त्यांच्या पत्नी काम पहातात.
पंजाबराव डख हे मुळात प्रगतशील शेतकरी

ही पण बातमी वाचा घरकूल योजनेसाठी नवीन यादी आली

Kon Aahet Panjabrav dkh

आहेत. शेती आणि शेतकऱ्यांवर त्यांचे जीवापाड प्रेम आहे. शेती सोबतच त्यांचा हवामान खात्याचा खुप चांगला अभ्यास आहे. पंजाबराव दुख हे १९९५ पासुन हवामानाच्या निरीक्षणावर गेली अनेक वर्षे ते हवामानाच्या अभ्यासावर आपले निरीक्षणे नोंदवून पावसाचा अचुक अंदाज नोंदवतात. पंजाबराव डख हे गेली अनेक वर्षापासून पावसाच्या नोंदी आपल्या वहीत लिहुन ठेवतात. या नोंदीचा आपल्याला हवामानाचा अचुक अंदाज वर्तवतांना खुप उपयोग होतो. प्रत्येक वर्षी १० ते १५ जून या कालावधीत हमखास पावूस हा येतोच येतो असे ही निरीक्षण पंजाबराव डख यांनी नोंदवले आहे. पंजाबराव डख सांगतात की, २०१६ साली देशात ऍनड्रॉईड फोन आल्यानंतर समाज माध्यमाचा वापर करीत आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हवामानाचा अंदाज पोहोचता करतो. समाजमाध्यमाचा वापर करीत आपण वॉटसएप ३६० ग्रुप बनवले असून ३ मिनीटात २.५ लाख लोकांपर्यंत तर अवघ्या काही मिनिटांत ३ कोटी लोकांपर्यंत पुढील १५ दिवसांत हवामान कसे राहील याचा अंदाज पोहोचवतो. या हवामानाच्या अंदाजामुळे कोट्यावधी शेतकऱ्यांना आपले होणारे संभाव्य नुकसान टाळता यावे ही आपली भुमिका आहे. आणि या हवामान अंदाजाचा शेतकऱ्यांना निश्चितच उपयोग होतो. हवामानाच्या अचुक अंदाज सोबतच

पंजाबराव डख यांचा शेतीवर ही खुप चांगला अभ्यास आहे. आजकाल नसर्ग हा लहरी बनला आहे. आणि या लहरीपणाचा फटका पारंपारिक शेतीच्या पध्दतीला बसत आहे. तेव्हा शेतकऱ्यांनी आता निसर्गाच्या लहरीचा अंदाज घेत आपली शेती केली पाहिजे आणि शेतीतील उत्पन्न वाढवले पाहिजे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *