Drone Favrani / ड्रोन तंत्रज्ञाना साठी मिळणारा 10 लाख रु

शेतकऱ्यांनी Drone Favrani तंत्रज्ञानाचा वापर करून “आत्मनिर्भर” होण्याच्या दिशेने पावले टाकावीत

खासदार उन्मेशदादा पाटील यांचे बळीराजाला आवाहन

केंद्र सरकारच्या अनुदानातून शेतकरी उत्पादक कंपनी/ शेतकऱ्यांची सहकारी संस्था/ ग्रामीण नव उद्योजक/ कृषी पदवीधारक/ अस्तित्वात असलेले अवजार बँक (सेवा सुविधा केंद्र) यांना ड्रोन खरेदी करिता केंद्र शासनाने उपलब्ध करून दिले अनुदान

जळगाव : शेतकऱ्यांना शेती करतेवेळी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून शेतीचा दैनंदिन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. शेती क्षेत्रात शेतकऱ्यांचा बहुतांशी खर्च खते व औषधे यावर खर्च होत असून मजुरांच्या टंचाईमुळे फवारणीचे काम करणे देखील शेतकऱ्याला न परवडणारे झाले आहे. याकरिता केंद्र शासनाने शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन व विविध कृषी संशोधन केंद्र यांच्याशी सल्लामसलत करून कृषी यांत्रिकरण उप अभियान अंतर्गत दि.17 जानेवारी 2022 रोजी शेतकऱ्यांना Drone Favraniसेवा व सुविधा उपलब्ध होण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत.

ही पण बातमी वाचा येत्या 8-10 दिवसात अनुदान या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात | Nuksan Bharpai Anudan | Ativrushti Bharpai


या अनुषंगाने Drone Favrani तंत्रज्ञानाचा वापर करून आत्मनिर्भर व्हावे असे आवाहन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केले आहे.
खासदार उन्मेशदादा पाटील यांनी वरील मार्गदर्शक सूचनेनुसार ड्रोन आधारित सेवा सुविधा केंद्र स्थापना करण्यासाठी अर्थसहाय्यास पात्र घटक/ लाभार्थी म्हणजेच शेतकरी उत्पादक कंपनी/ शेतकऱ्यांची सहकारी संस्था/ ग्रामीण नव उद्योजक/कृषी पदवीधर अस्तित्वात/ असलेले अवजारे बँक (सेवा सुविधा केंद्र) आहेत. मार्गदर्शक सूचनेचे अवलोकन केले असता मिळणाऱ्या अनुदानाचा विचार केला असता शेतकरी उत्पादक कंपनी/शेतकऱ्यांची सहकारी संस्था/ग्रामीण नव उद्योजक यांना 40% किंवा रू.4.00 लाख (जे कमी असेल) तेवढे अनुदान स्वरूपात मिळेल. तसेच कृषी पदवीधर यांना अपग्रेडिंग कस्टम हायरिंग सेंटर करिता 50% किंवा रू.5.00 लाख रुपये (जे कमी असेल) एवढे अनुदान मार्गदर्शक सूचनेप्रमाणे निश्चित केलेले आहे.यासाठी जिल्हयात जास्तीत जास्त अर्ज सादर करण्याचे खासदार उन्मेश दादा पाटील असे आवाहन यांनी केले आहे

ही पण बातमी वाचा आधार कार्ड फोटो अपलोड करा

तालुका कृषि अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा

जळगाव जिल्ह्यात 145 शेतकरी उत्पादक कंपन्यांची स्थापना झालेली असून 60 ते 70 शेतकरी उत्पादक कंपन्यांनी एकत्र येऊन जिल्ह्यात महा एफ.पी.सी. या नावाने फेडरेशन देखील स्थापन केली आहे. जळगाव जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक कंपन्या/ सहकारी संस्था/कृषी पदवीधर/ ग्रामीण व उद्योजक व अवजारे बँक असलेल्यांनी सदरील योजनेचा अर्ज करून लाभ घेण्याचे आवाहन खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केले आहे.
तातडीने अर्ज करावे सादर


सदरचा अर्ज करतेवेळी आवश्यक असणारी कागदपत्रे आधार कार्ड फोटो असलेले ओळखपत्र ची स्वयसाक्षांकित प्रत/खरेदी करावयाचे ड्रोन चे अधिकृत विक्रेत्याचे कोटेशन/ बँक पासबुक च्या पहिल्या पानाची छायांकित प्रत/ संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र/ संस्थेच्या संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यात अनुदान जमा करण्यास संस्थेचे प्राधिकृत केली असल्याचे प्राधिकृत पत्र/ अधिकृत रिमोट पायलट ट्रेनिंग संस्थेकडून प्रशिक्षण घेतल्याचे रिमोट पायलेट परवानाधारक चालकाचे नाव व तपशील तसेच या बाबतचा अर्ज अधिकची माहिती करिता संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात भेट देण्याचे देखील केले आवाहन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *