राज्यात जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत अतिवृष्टी त्याचप्रमाणे पुरामुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावरील शेती पिकाचं नुकसान झाले. या नैसर्गिक संकटामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना १० हजार कोटींचे अर्थसहाय्य आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर केले.
प्रस्तावना:
जुलै, २०२१ मध्ये झालेलया अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेलया पुररिस्थितीमुळे राज्यातील
काही जिल्हयांमध्ये नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या पुरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी मदत
देण्याबाबत दिनांक ०३.०८.२०२१ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णयानुसार संदर्भाधीन क्रमांक ३ येथील शासन
निर्णयान्वये मदतीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. संदर्भाधीन क्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये विहित
केलेल्या दरानुसार तसेच संदर्भाधीन क्रमांक १ येथील शासन निर्णयान्वये विहित केलेल्या दरानुसार बाधितांना मदत
देण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे प्रस्ताव विभागीय आयुक्त यांचेकडुन संदर्भाधीन क्रमांक ४ ते ९ येथील पत्रान्वये
प्राप्त झाले आहेत, त्यानुसार बाधित नागरिकांना मदतीचे वाटप करण्यासाठी निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या
विचाराधीन होती.
या बातमी वर क्लीक करून नक्की पहा या योजने मिळणार शेळी साठी अनुदान
वरील लिंक वर क्लीक करून पहा
शासन निर्णयः
जुलै, २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पुरपरिस्थितीमुळे मृत
जनावरांसाठी मदत, पुर्णत: नष्ट/अंशत: पडझड झालेली कच्ची/पक्की घरे, झोपडी, गोठे, मत्स्य बोटी व जाळयांसाठी
२. अर्थसहाय्य, मत्स्यबीज शेतीसाठी अर्थसहाय्य, दुकानदार, टपरीधारक व कुक्कुटपालन शेडच्या नुकसानीसाठी मदत व
इतर अनुज्ञेय बाबींकरिता बाधितांना मदतीचे वाटप करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून या शासन निर्णयासोबत जोडलेल्या सहपत्रांत (विवरणपत्र-१ व २) दर्शविल्याप्रमाणे एकूण रु ५५४८७.५३ लाख ( अक्षरी रुपये पाचशे चौपन्न कोटी सत्याऐंशी लाख त्रेपन्न हजार फक्त) इतका निधी विभागीय आयुक्त यांचेमार्फत जिल्हयांना वितरीत करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.
या शासन निर्णयासोबत जोडलेल्या सहपत्राप्रमाणे लेखाशीर्षनिहाय निधी बीम्स प्रणालीवर विभागीय आयुक्त यांना कार्यासन म-११ यांनी तात्काळ वितरित करावा.
- वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सुचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. संदर्भाधीन क्रमांक ३ येथील दिनांक ११.०८.२०२१ च्या शासन निर्णयान्वये मदतीचे वाढीव दर मंजूर करण्यात आले आहेत. त्या वाढीव दरापैकी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (SDRF) संदर्भाधीन क्रमांक १वर येथील शासन निर्णयातील दराने मदत प्रदान करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या लेखाशीर्षाखाली वितरित करण्यात आलेला निधी खर्च करण्यात यावा आणि वाढीव मंजूर दर वजा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर यातील फरकाच्या मदतीची रक्कम राज्य शासनाच्या निधीमधुन वितरित करण्यात आलेला निधीतून भागविण्यात यावा. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च करण्यात यावा.
४. पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. या शासन निर्णयान्वये संपूर्ण रक्कम बीम्स प्रणालीवर
वितरित करण्यात येत असली तरी, लाभार्थी निश्चित झाल्यानंतर वित्तिय शिस्तीच्या दृष्टीकोनातून संबंधित जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष गरजेनुसारच कोषागारातून रक्कम आहरित करून त्यानंतरच रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट ऑनलाईन पध्दतीने हस्तातंरित करण्यात यावी. सदर निधी अनावश्यकरित्या कोषागारातून आहरित करून बैंक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येवू नये. या आदेशान्वये मंजूर करण्यात आलेल्या अनुदानाच्या मर्यादेतच खर्च करण्यात यावा. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पुर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्हयांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या मानकानुसार खर्च करण्यात येणाऱ्या निधीची माहिती केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने विकसित केलेल्या NDMIS या प्रणालीमध्ये नोंदविण्यात यावी. सर्व सुचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील,
५. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखे निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या स्तरावर
ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालये व महालेखापाल कार्यालयाशी त्रैमासिक ताळमेळ
घेण्यात यावा. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून उपलब्ध करून दिलेला उपरोक्त
निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून घेवून एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहील.
६. वरील प्रयोजनासाठी प्रधान लेखाशीर्ष २२४५ – नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय, ०२ पुर चक्रीवादळे
इत्यादी अंतर्गत सोबतच्या विवरणपत्रात (विवरणपत्र-१ व २) दर्शविलेल्या सर्व उप/गौण शिर्षाखाली ३१- सहाय्यक
अनुदाने या उद्दीष्टाखाली निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.