राज्यात मुसळधार पाऊस ( Maharashtra Havaman andaj 2024 )

Maharashtra Havaman andaj 2024 : संत्रा, भाजीपाला पिकाला फटका बसण्याची भीती जिल्ह्यात आजही पावसाची
शक्यता; शेतकरी धास्तावले!

खामगाव गत दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत आहे. त्यामुळे फळबागा व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आणखी ७ जानेवारी रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या
पावसाची शक्यता हवामान खात्याच्या वतीने वर्तविण्यात आली आहे.

20240107 160101
Maharashtra Havaman andaj 2024

जिल्ह्यात ५ जानेवारी रोजी
रिमझिम तर ६ जानेवारी रोजी सायंकाळी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले
आहे. मृग बहाराचा संत्रा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. संत्रा पुढील महिन्यात तोडण्यात येणार आहे. ऐन तोडणीच्या पूर्वी अवकाळी पावसाने संत्रा गळून पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

https://abmarathi.com/maharashtra-talathi-result-2024/


उत्पादक तसेच भाजीपाला शेतकऱ्यांना फटका बसला आहे. मिरची व टोमॅटो, दोडके पिकाची झाडे वादळी वारा व पावसाने जमीनदोस्त झाली आहेत. हजारो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी भाजीपाल्याची लागवड
केली. यावर्षी पावसाळ्यात अल्प पाऊस झाला. मात्र, गत दोन दिवसांत होत असलेल्या पावसामुळे भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे.

दुसऱ्यांदा बसला अवकाळीचा फटका जिल्ह्यात भाजीपाला व संत्रा बागांना
गत दोन महिन्यात दुसऱ्यांदा अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये अखेरच्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह जोरदा पाऊस झाला होता. . यावेळी
शेतकयांना नुकशेतकरी सावरले व सहन करावे लागले. यातून पुन्हा पीक उभे केले. मात्र, गत दोन दिवस पुन्हा पावसाचा फटका बसला आहे. आणखी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. उत्तर कोकण ते लक्षद्वीपमध्ये कमी दाबाची द्रोणीय स्थिती
उत्तर कोकण ते लक्षद्वीपमध्ये कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. पूर्व उत्तर प्रदेश वर पश्चिमी चक्रवात चक्राकार वाऱ्याच्या रूपाने सक्रिय आहे. या भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे गत दोन
दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस होत आहे.

पीकविमा यादी इथे पहा


Maharashtra Havaman andaj 2024 : उत्तर कोकण ते लक्षद्वीप कमी दाबाची द्रोणीय स्थिती आहे. पूर्व उत्तर प्रदेश वर पश्चिमी चक्रवात चक्राकार वाऱ्याच्या रूपाने सक्रिय आहे. त्यामुळे ७ जानेवारी रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते पावसाची शक्यता आहे. ७ जानेवारी रोजी किमान तापमान आहे तसेच राहणार असून, ढगाळ वातावरण राहील.

  • मनेश यदुलवार,
    कृषी हवामान तज्ज्ञ, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *