गोदाम साठी अनुदान मिळणार असा घ्या लाभ ( Warehouse Subsidy Yojana )


Warehouse Subsidy Yojana : राज्यातील शेतकऱ्यांना शेती प्रक्रिया आणि कृषी विषयक साधनसामुग्री साठविण्यास मदत
करण्यासाठी विशेषत: ग्रामीण भागात सर्व संबंधित सुविधांसह साठवण क्षमता निर्माण करणे, कृषी प्रक्रियांची बाजारपेठ सुधारण्यासाठी त्याच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणे,

आयुष्यमान भारत योजना कार्ड

वित्त पुरवठा व विपणन कर्जाची सुविधा उपलब्ध करुन देऊन अपव्यय व बिघाड रोखणे, गोदामांमध्ये साठवून ठेवता येईल अशा शेतमालाच्या संदर्भात छोट्या
शेतकऱ्यांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, भारतातील कृषी गोदामांच्या बांधकामात खाजगी व सहकारी क्षेत्रांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहीत करुन कृषी गुंतवणुकीतील प्रक्रियेचे पुनरुज्जीवन करणे, जेणेकरुन ते शेतकरी त्यांचा शेतमाल साठवण्यासाठी सहज उपलब्ध होतील. त्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांकरीता “गाव तिथे गोदाम” ही योजना कार्यान्वित करावयाची आहे.

20240116 093158
Warehouse Subsidy Yojana


“गाव तिथे गोदाम” योजनेचे प्रारूप तयार
करण्यासाठी समिती गठीत करणेबाबत उपरोक्त प्रस्तावित योजनेच्या अंमलबजावणीकरीता वाचा येथील सरव्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे यांचे अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने शासनास अहवाल सादर केलेला आहे. त्याअनुषंगाने “गाव तिथे गोदाम” या प्रस्तावित योजनेचे प्रारूप तयार करण्यासाठी समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

राशन कार्ड बंद होणार

Warehouse Subsidy Yojana : “गाव तिथे गोदाम” या योजनेच्या अभ्यास समितीच्या अहवालातील सर्वकष मुद्दे विचारात घेऊन सदर योजना प्रत्यक्षात कार्यरत होण्यासाठी “गाव तिथे गोदाम” योजनेचे प्रारूप तयार करुन शासनास शिफारस करणेकरीता खालीलप्रमाणे समिती गठीत करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *