छतावर सोलर बसवणे साठी 54 हजार अनुदान मिळणार Solar Panel for Home 2024

Solar Panel for Home 2024 : तुमच्या छतावर वीज निर्मितीसाठी पुढाकाराचे आवाहन
जिल्ह्यात २ हजार नागरिक झाले वीज निर्माते! अनुदान ४०%

इथे क्लीक करून अर्ज करा

वाढत्या वीजबिलापासून मुक्ती मिळविण्याकरिता सौरउर्जेव्दारे वीज निर्मिती करण्यावर नागरिक भर देत आहेत. जिल्ह्यातील दोन हजार वीस वीज ग्राहकांकडून छतावर वीज निर्मिती करण्यात येत आहे. सौरउर्जा ही स्वच्छ आणि प्रदूषणविरहित ऊर्जेचा उत्तम स्रोत आहे. तसेच रूफ टॉप सोलर योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून मोठ्या प्रमाणात अनुदान मिळते.

20240211 100812
Solar Panel for Home 2024
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तीन किलोवॅटपर्यंत क्षमतेचे पॅनेल बसविण्यासाठी १ लाख ५७ हजारांचा खर्च येतो. त्यामध्ये चाळीस टक्के ५४ हजार रुपये अनुदान देण्यात येते. त्यामुळे ग्राहकाला १ लाख ३ हजार रुपये खर्च येतो. सौरउर्जेतून निर्माण होणाऱ्या विजेमुळे ग्राहकाला नेहमीचा वीजपुरवठा कमी वापरावा लागतो व वीजबिलात कपात होते. ग्राहकाच्या 54 हजार अनुदान मिळणार
सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीजबिलात सवलत देते. यातून कधी- कधी ग्राहकांना शून्य रकमेचे वीजबिलही येते. या पॅनलचा उपयोग पंचवीस वर्षे होत राहतो.

घरकुल यादी


ग्राहकाला १ लाख ३ हजार रुपये खर्च
१० ते ४० टक्क्यांपर्यंत अनुदान ग्राहकांना सौरउर्जा प्रकल्प बसविण्याकरिता १० ते ४० टक्क्यांपर्यंत अनुदान
देण्यात येते. १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के अनुदान, ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान, सामूहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह निवासी
गृहनिर्माण संस्था या ग्राहकांना २० टक्के अनुदान, शिल्लक वीज महावितरणकडून प्रति युनिटप्रमाणे विकत घेण्यात येते. याठिकाणी करा अर्ज
सौरउर्जा निर्मितीसाठी पॅनेल बसवू इच्छिणाऱ्या ग्राहकांना महावितरणच्या
mahadiscom.in/इस्मार्ट
या वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागतो. सौरउर्जा प्रकल्पात मदत करण्याकरिता पॅनेल बसविणाऱ्या एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे. या एजन्सीसह महावितरणची मदत मिळते.

Solar Panel for Home 2024 : अतिरिक्त वीज महावितरण घेते विकत
■ घराच्या छतावर सौर पॅनलद्वारे ग्राहकाच्या आवश्यकतेपेक्षा जास्त वीज तयार झाली तर शिल्लक वीज महावितरण प्रति युनिटप्रमाणे विकत घेते. सौरउर्जा निर्मितीसाठी ग्राहकांनी ३ किलोवॅट ते दहा किलोवॅट क्षमतेचे पॅनेल्स बसविले तर वीस टक्के अनुदान मिळते. घरगुती ग्राहकांना या योजनेत सुविधा अनुदान मिळते. औद्योगिक ग्राहकही रुफ टॉप सोलर पद्धतीने वीजनिर्मिती करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *