Pikvima / २०२२ च्या दुसऱ्या टप्प्यातील पीक विमा वितरणास सुरुवात

२०२२ Pikvima मधील नुकसानीपोटी पहिल्या टप्यात पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. भारतीय कृषी विमा कंपनीकडे राज्य व केंद्र सरकारच्या हप्त्याची रक्कम प्राप्त होताच या आठवड्यात २०० कोटी रुपये वितरित करण्याचे विमा कंपनीचे महाव्यवस्थापक तथा सहसंचालक श्री.सिद्धेश रामसुब्रमण्यम यांनी आपल्याला आश्वस्त केले होते. त्या अनुषंगाने आज विमा वितरणास सुरुवात झाली आहे.खरीप २०२२ मधील पिकांच्या नुकसानीपोटी विमा कंपनीने आजवर २५८ कोटी रुपये वितरित केले असून आता २०० कोटी रुपये वितरित करण्यास सुरुवात केली आहे.

यातून बहुतांश Pikvimaशेतकऱ्यांना दिलासा मिळेल. मात्र तरीही ५०% भारांकण लावून वितरित केलेली नुकसान भरपाई, अत्यल्प विमा रक्कम मिळालेले शेतकरी, अधिसूचना देऊनही नुकसान भरपाई न मिळालेले शेतकरी व पंचनामा न झालेल्या शेतकऱ्यांसाठीचा लढा पुढे सुरूच राहणार आहे. यासाठी पंचनामे आवश्यक असून धाराशिव येथील कार्यालयावरील हल्ल्यामुळे मुंबई कार्यालयात पंचनामे जमा करण्याची प्रक्रिया सुरू असून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *