latur nuksan bharape / अखेर नुकसानभरपाई मंजूर

latur nuksan bharape नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अखेर नुकसानभरपाई मंजूर; भाजप – शिवसेना सरकारचे खूप खूप आभार.

कंपनी मध्ये नोकरी

सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून लातूर जिल्ह्यासह संततधार पावसामुळे नुकसान झालेल्या मराठवाड्यातील सुमारे ६ लक्ष शेतकऱ्यांना ७५५ कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्यास मंत्रिमंडळ उपसमितीने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे लातूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमधील ३.४२ लक्ष शेतकऱ्यांना २९० कोटी रुपयांची नुकसानभरपाई मिळणं अपेक्षित आहे. या संदर्भात माझे मदत कार्य व पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव श्री असीमजी गुप्ता यांच्याशी बोलणे झाले असून तसे शासकीय आदेशही पुढील १-२ दिवसांत निर्गमित होतील.

Gopinath munde shetkari apghat vima /गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

एनडीआरएफच्या निकषाच्या पलीकडे जाऊन लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल मुख्यमंत्री मा श्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा श्री देवेंद्रजी फडणवीस व कृषिमंत्री मा श्री अब्दुलजी सत्तार व मंत्रिमंडळ उपसमितीचे सदस्य श्री गिरीशजी महाजन यांचे खूप खूप आभार. सभागृहात लक्षवेधी मांडून, २९२ वरील चर्चेत सहभागी होऊन तसेच त्यानंतर २-३ वेळा मा मुख्यमंत्री व मा उपमुख्यमंत्री महोदयांची भेट घेऊन यासंदर्भात पाठपुरावा केला होता. संततधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना संकटकाळात मदत मिळत असल्याचा मनस्वी आनंद आहे.

latur nuksan bharape

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *