Insurance in nuksan /नुकसान भरपाई 1500 कोटी मंजूर

सततच्या Insurance in nuksan पावसाच्या अनुदानासाठी महायुती सरकारने सुमारे १,५०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. त्यातील धाराशिव जिल्ह्यासाठी सुमारे १३७ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे.सततच्या पावसाच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ ई-प्रमाणिकरण करून घ्यावे.. ई-प्रमाणिकरण होताच अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.आजवर शेतकऱ्यांना केवळ अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानी साठी राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी निकषाप्रमाणे मदत दिली जात होती. Insurance in nuksan

मात्र महायुती सरकारने यापुढे जाऊन सततच्या पावसाने झालेल्या नुकसानी साठी देखील मदत दिली आहे. जिल्हा प्रशासनाकडून लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या संकेतस्थळावर अपलोड केल्या जात आहेत. जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनंतर या याद्या गावोगावी डकविण्यात येणार आहेत.सदरील यादीमध्ये नावाची खात्री करून संबंधित शेतकऱ्यांनी ई-प्रमाणिकरण (ई-केवायसी) करून घेणे अपेक्षित आहे. त्यानंतर अनुदानाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे. तहसीलदार यांच्याकडून लाभार्थी शेतकऱ्यांच्या आजवर अपलोड केलेल्या याद्या प्रमाणित करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या होत्या.त्या अनुषंगाने आज ४७,११७ शेतकऱ्यांच्या याद्या मंजूर करण्यात आल्या आहेत. राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये ई-प्रमाणिकरण प्रक्रिया सुरू झाली आहे. खरीप पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना पैशाची गरज असताना शासनाने पैसे उपलब्ध करूनही शेतकऱ्यांना वितरित करण्यात दिरंगाई होत आहे.प्रसिद्ध करण्यात आलेला याद्यांमध्ये शेतकऱ्यांनी नाव, बँक खाते, आधार कार्ड क्रमांकाची खात्री करून ई-प्रमाणिकरण करून घ्यावे.#केवायसी #पिक #विमा #मदत #शेती #शेतकरी #धाराशिव #KYC #Insurance #Help #Agriculture #Farmers #Dharashiv

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *