25 जानेवारी पर्यंत पीकविमा खात्यात जमा होणार ( crop insurance maharashtra )

crop insurance maharashtra : खरीप हंगाम २०२२ मधील पिकविम्याचे प्रलंबित २९४ कोटी रुपये २५ जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार..

पीकविमा यादी इथे क्लीक करून नक्की पहा

सण २०२२ सालच्या खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीने शेतीपिकांचे नुकसान झाले होते. मात्र, विमा कंपनीने भारांकनाचा निकष चुकीच्या पद्धतीने लावत ५० टक्केच भरपाई दिली. १ लाख ३४ हजारांवर शेतकऱ्यांच्या पूर्वसूचना अपात्र ठरविल्या. याबाबत आपण विभागीय समितीकडे स्वत: तक्रार केली होती. या समितीने संपूर्ण भरपाई तसेच पूर्वसूचनांची पुन्हा पडताळणी करण्याचे आदेश देतानाच पंचनाम्याच्या प्रती उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिले होते. पुढे राज्य तांत्रिक सल्लागार समितीनेही हेच आदेश दिले. परंतु, कंपनी हे आदेश पाळत नसल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी महसुली वसुलीच्या तीन नोटिसा दिल्या.

20240211 124629
crop insurance maharashtra
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

इतके होवूनही कंपनी दाद देत नसल्याने आपण ३ जानेवारी रोजी कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांची पुणे येथे भेट घेतली होती व या विषयात लक्ष घालून शेतकऱ्यांचे प्रलंबित २९४ कोटी रुपये मिळवून देण्यासाठी कार्यवाही करण्याची मागणी केली होती.

घरकुल यादी इथे क्लीक करून पहा

डॉ. प्रविण गेडाम यांनी यात लक्ष घातल्याने आठ दिवसातच याला गती मिळाली असून, विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी ८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांची भेट घेऊन प्रलंबित रक्कम शेतकऱ्यांना वितरित करण्यास कंपनी तयार असल्याचे लेखी पत्र दिले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी २५ जानेवारी पर्यंत ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश विमा कंपनीस निर्गमित केले आहेत. त्यामुळे २०२२ मधील प्रलंबित विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

crop insurance maharashtra : ही विमा रक्कम प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईपर्यंत आपला विमा कंपनी व प्रशासनाकडे पाठपुरावा सुरूच राहील..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *