हेक्टरी 7 लाख रुपये मिळणार ( bamboo grant )

bamboo grant : बळीराजसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री  यांनी बाबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी बाबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाबू लागवड केल्यास सात लाख रुपये हेक्टरी अनुदान देण्याची घोषणा केली आहे.


मागील काही दिवसांपासून सरकारने शेतकऱ्यांसाठी बाबू लागवड वाढवण्यासाठी विविध योजना राबवत आहे.

20240118 125438

बांबू लागवडीमुळे पर्यावरणाला मोठा फायदा होईल, असा राज्य सरकारचा विश्वास आहे. याशिवाय चांगले
उत्पन्न मिळेल आणि हवेचा दर्जाही सुधारेल. यामुळे सरकारच्या या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद दिसून येत आहे.

सात लाख रुपये अनुदान ७ लाख रुपये अनुदान मिळणार महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन करत आहे. शेतकऱ्यांनी बाबूची लागवड केल्यास त्यांना हेक्टरी ७ लाख रुपये अनुदान दिले जाणार आहे. मुंबईल झालेल्या पर्यावरण शाश्वतता शिखर परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. या कार्यक्रमात विविध देशांतील संशोधक आणि बांबू तज्ज्ञ सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, गोदरेज उद्योग समूहाचे नादिर गोदरेज आणि पर्यावरण व हवामान बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे उपस्थित होते

पीकविमा

bamboo grant : पर्यावरण संवर्धनासाठी बांबू लागवड हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे मनोगत पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेमध्ये मान्यवरांनी व्यक्त केला आहे.

पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, फिनिक्स फाऊंडेशन संस्था, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे क्वीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

बॅनhttps://abmarathi.com/birthday-baner/र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *