usmanabadi sheli palan / शेळी पालन साठी 80 हजार रुपये नवीन GR

usmanabadi sheli palan
प्रस्तावना- शेळी / मेंढी गटवाटप, राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजना सन २०११-१२ पासून कार्यान्वित असून या दोन्ही योजनांतर्गत लाभधारकांना लाभ देताना, शेळ्या-मेंढ्या तसेच बोकड – नर मेंढा यांची संदर्भाधिन शासन निर्णयांमध्ये विहित केलेली किंमत आधारभूत मानून त्यानुसार लाभ देण्यात येत आहेत.

ही पण बातमी वाचा PM किसान चा 7 हफ्ता या तारखील / फक्त या शेतकरी मिळणार

परंतु, शेळ्या-मेंढ्या तसेच बोकड – नर मेंढा यांच्या किंमतीत वेळोवेळी वाढ होत असल्याने, शासन निर्णयात विहित दराने शेळ्या-मेंढ्या तसेच बोकड – नर मेंढा उपलब्ध करुन देण्यास अडचणी येत असून, त्याबाबत लाभधारक
तसेच लोकप्रतिनिधींकडून उक्त योजनांतर्गत दर सुधारित करण्याची वारंवार मागणी करण्यात येत आहे.

usmanabadi sheli palan

तद्नुषंगाने राज्यस्तरीय योजना व जिल्हास्तरीय योजनेमध्ये एकरुपता आणण्याच्या दृष्टीने संदर्भाधिन दिनांक ०२.०७.२०११ व दिनांक १६.०९.२०११ या शासन
निर्णयांद्वारे राबविण्यात येत असलेल्या योजनांमधील शेळी/मेंढी वाडा, खाद्याची व पाण्याची भांडी व आरोग्य सुविधा आणि औषधोपचार या उपघटकांना वगळून शेळ्या / मेंढ्यांचे सध्याचे बाजारमूल्य विचारात घेऊन, उक्त किंमतीत वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.

नोकरी भरती 2022

त्याअनुषंगाने दिनांक १२.५.२०२१ रोजी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत प्राप्त मान्यतेनुसार खालीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *