शेतकऱ्यांनी अशी करा तूर लागवड होणार फायदा tur lagvdha

 आम्ही शेतकरी: तुर पिकाचे नियोजन tur lagvdha
तुर तंत्र :- महाराष्ट्रातील मुख्य व महत्त्वाचे पिक म्हणजे तुर आंतरपिक
म्हणुनच जास्त लागवड केल्या जाते कापुस अथवा सोयाबीन या पिकांमध्ये
तुरीचे आंतरपीक म्हणुन घेतले जाते. कोरडवाहू व हलक्या किंवा मध्यम जमिनीत लागवड करावयाची असल्यास मध्यम कालावधीचे वाण निवडणे फायद्याचे ठरते.

जसे मारोती टि.- २१, संपदा नं.-१४८ व भारी जमिनीत दीर्घ
मुदतीचे वाण घ्यावे. जसे आशा, बी.एस.एम. आर.- ७३६, बी.एस.एम.आर.-८५३, सी-११. १६५ ते २०० दिवसाच्या मुदतीममध्ये तुरीचे पिक काढावयास येते.
बियाणे प्रक्रिया :- ५ किलो पर्यंत बियणे घेतल्यास युमिक जेल -५०ग्रॅम व बावीस्टीन -५० ग्रॅम कालवुन बीज प्रक्रिया करणे व बियाणे रात्रभर वाळवून घेणे.
 पेरणी / लागवड :- आंतरपीक म्हणून घेतांना दोन ओळीतील अंतर
आपण ठरवावे. मात्र दोन झाडांमधील अंतर १ फुट ठेवावे. लागवड / पेरणी
करतांना बियाणे दाट पडल्यास विरळणी करून घ्यावी.
पहिली आळवणी (ड्रिंचींग):- पेरणीनंतर १० ते १२ दिवसांनी ही
आळवणी करावी.
ह्युमिक जेल -१०० ग्रॅम
व्हि.सी.ओ.सी. – १०० ग्रॅम व
१९:१९:१९ – १०० ग्रॅम प्रति १५ लिटर पंप.

pigeonpea1

या आळवणी मुळे तुरीच्या पांढऱ्या मुळया खोलवर जाउन सोटमुळ
सुदृढ होते. व उपमुळया भरपुर फुटतात म्हणून मर रोग लागत नाही. ठिंबक
असल्यास युमिक जेल – १ किलो
व्हि.सी.ओ.सी.-१ किलो
१९:१९:१९-१ किलो हे प्रमाण घ्यावे.
दुसरी आळवणी (ड्रिंचींग):– पेरणी पासुन १८ ते २० दिवसांनी दुसरी
आळवणी (ड्रिचींग) करावी.
उर्जा -२०० मिली. त्रिकाल -१०० मिली. ठिंबकवर असल्यास
उर्जा – २लिटर व त्रिकाल – १ लिटर प्रति एकरी सोडावे.
खताची पहिली मात्रा :- लागवडीपासनु २२ ते २४ दिवसात
खताची पहिली मात्रा टाकावी. tur lagvdha
डी.ए.पी. बॅग
निंबोणी पेंड – २ बॅग
पोटॅश -२५ किलो
युरिया – २५ किलो
हायपॉवर – १० किलो
शक्तीगोल्ड – १० किलो
वरिल सर्व घटकांचे मिश्रण करून बेड वर मधोमध टाकावे.
त्यानंतर ठिंबक द्वारे पाणी सोडावे.
 पहिली फवारणी :- लागवडीपासुन ३० ते ३२ दिवसात पहिली tur lagvdha
फवारणी करावी. (जुन्या फवारणीमध्ये बदल केलेला आहे.)
ह्युमिक जेल – २५ ग्रॅम
चॅलेजर – ५ मिली
व्हि.ठोको.
२० ग्रॅम,
नीमहटर – २० मिली.
या नंतर लगेच शेतकरी बांधवानी आपल्या शेतामध्ये हॅलोजन
लाईट किंवा साधे लाईट लावावे. हे लाईट २० जुलै पासुन तर २० सप्टेंबर
पर्यंत रोजी रात्री चालु ठेवावे. म्हणजे कंद माशीचा प्रादुर्भाव आपल्या हळद
पिकावर होणार नाही. एक मादी माशी किमान १४० अंडे देते व या अंडया
तुन बाहेर पडलेल्या अळया पिकाच्या कंदाचे रस शोषून करतात व कंद
पिळपिळे करतात व सड लागते म्हणून लाइट लावणे हे आवश्यक
कार्य आहे.
: -२५ ग्रॅम
२० मिली
 तिसरी फवारणी :– चफली (बारीक शेगं) बनत असतांना शेगांची लांबी
वाढविणे, दाण्याची संख्या वाढविणे व दाण्याचा आकार वाढवुन चमक निर्माण
करण्याचे कार्य करावे लागते. अशा वेळेस पुढील फवारणी करावी.
अॅमिनो जेल -२५ ग्रॅम
कॉम्बो
माइट
नीमहटर – २० मिली प्रति १५ लिटर पंप.
भुंगेरे, पतंगे, शेगमाशी, शेगां पोखरणारी अळी यांचा बंदोबस्त
या फवारणीतुन करता येतो.

तुर पिकाला २० ते २५ दिवसात पहिली व ३५ ते ४० दिवसात
दुसरी कोळपणी करावी. तरच जमिन भुसभुसीत राहते व जमिनीत हवा खेळती राहते त्यामुळे पीक वाढीस पोषक वातावरण तयार होते. जमिन तण विरहीत ठेवावी. पावसामध्ये खंड पडल्यास किंवा पाण्याचा ताण पडल्यास ३० ते ४५ दिवसांत नंतर ६० ते ७० दिवसात व शेंगा भरावयाच्या tur lagvdha अवस्थेत
पाणी द्यावे.

ही पण बातमी वाचा थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022
 तुरीवरील किडी व रोग :-
किडी :- घाटे अळी, शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगमाशी,
खोडी माशी, शेंग ढेकुण.
 रोग :- मर रोग, करपा, मुळ कुजव्या, भूरी, पानावरील ठिपके,
वरील करपा, तांबेरा, वाझ रोग.
वरील सर्व किडी व रोगांचा विचार करुनच तंत्रामध्ये फवारण्यांचे
घटक समाविष्ट करण्यात आलेले आहे.

२-भुईमुगाची लागवड
जमीन व हवामान – या पिकाला सर्वसाधारण पणे २१ ते ३०” से.ग्रे.तापमान पोषक असते. भरपूर
सूर्यप्रकाश व उबदार हवामान पिकाच्या वाढीस योग्य असते.
पाण्याचा नीचरा होणारी मध्यम ते हलकी जमीन भुसभुशीत जमीन आवश्यक आहे. जमीनीत चुना व
सेंद्रिय पदार्थ जास्त असावे. म्हणजे शेंगा चांगल्या पोसल्या जातात. चीकणमातीच्या जमीनीत लागवड
करू नये.

पर्मनंट नोकरी

पूर्वमशागत-. पूर्वी चे पीक काढल्यावर खोल नांगरट केली कुळवाच्या २-३ पाळ्या केल्यास जमीन
भुसभुशीत होते. वेचणी करून रान स्वच्छ करावे.शेवटच्या पाळीपुर्वी सूपर फॉस्पेट । बॅग व फोरेट
अथवा थीमेट -६ किलो प्रती एकर शीपूण पाळी केल्यास जमीनीतले कोष नष्ट होतील.एसबी-११, टीजी-
१७,आयसीजीएस११,४४ युएफ-८०-१०३ या जातीपैकी वाण नीवडावा.
डिसेंबर शेवटच्या आठवड्यात किंवा जानेवारी पहिल्या हप्त्यात पेरणी करून मे महीन्यात पीक
काढल्यावर खरीपाकरीता जमीन तयार करता येईल. बिज प्रक्रीया- ४०-५० किलो बियाणे प्रती एकर
करीता घेऊन ह्यूमीकजेल-१२५ ते १५० ग्राम, बावीस्टीन-१२५ ते १५० ग्राम २ लीटर पाण्यात कालवून
बियाणे फारीवर टाकून एकाने शीपडावे व दोन जणांनी फारी हलवावी. रायझोबियम जिवाणू टाकल्यास
उत्तम. रात्रभर बियाणे वाळूदयावे.
परणी:-ओल कस्न वापसा झाल्यावर पाभरीच्या साहाय्याने अगर टोकण पध्दतीने पेरणी करावी.
साधारणता दोन ओळीतील अंतर १२ ईच म्हणजेच । फुट व दोन रोपातील अंतर ४ ते ६ इंच अंतर
ठेवावे.पसर्या जातीसाठी दोन ओळीतील अंतर दिड फुटाचे ठेवावे. बियाणे २-३ इंच खोल ओल्या मातीत
पेरावे. पेरणी टोकण पध्दतीने केल्यास एका ठिकाणी २ बिया टाकाव्यात. गवणीच्या काळात कावळे व
ईतर पक्षी बियाणे खातात. जास्त उताराच्या जमिनीवर पेरणी उताराच्या आडव्या दिशेने करावी म्हणजे
जलसंधारण चांगले होते.
खते.:- पेरणीपूर्वी डिएपी-१ बॅग,.युरीया -२५ कीलो, हायपाँवर-१० किलो व शक्तीगोल्ड-१० किलो यांचे
मीश्रण पेरावे.पेरणी पूर्वी शक्य न झाल्यास ऊगवणीनंतरही खत टाकता येते.. फवारणी-
भुईमूगास जास्त पाणी दिले गेले तर पाने पिवळी पडतात.पानातील अन्न तयार करण्याची क्रिया
मंदावते तसेच लोह व जस्त कमी असल्यास पाने पिवळी पडतात अशावेळेस हायपॉवर १० किलो
ऐवजी -२० किलो घेणे,
पहिली फवारणी-२४-२८ दिवसात- ह्यूमीकजेल-२५ ग्राम,चॅलेंजर-१ मी.ली. झौंकोवीट-२० ग्राम,व न्यूवान-
३० मी.ली प्रती पंप फवारणे. पेरणीनंतर नांगे आढळून आल्यास ताबडतोब भरावे..
दुसरी फवारणी- ४०-४५ दिवसात-चमत्कार-4 मी.ली.,फ्लॉवरस्ट्रॉग-२५ मी.ली.यावेळेस मावा, तुडतुडे,
फुलकिडे, टिका,तांबेरा यांचा प्रादुर्भाव असतो तर याच फवारणी मध्ये उलाला-८ ग्राम व नीबोनी अर्क-
१०००० पीपीएम-४० मी.ली प्रती पंप फवारणी करणे.तांबेरा ( टिक्का) दिसत असल्यास
साफ,रोको,नेटीओ यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक सोबत घ्यावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *