Thibk sichan anudan /१३दिवसात मिळणार अनुदान

Thibk sichan anudan प्रणालीसाठी
१३दिवसात मिळणार ८०टक्के
अनुदान
सोलापूरः आपल्या देशात शेती ही सर्वस्वी पावसाच्या
पाण्यावर आधारित आहे. यामुळे पाण्याचे प्रभावी
नियोजन करणे आता अपरिहार्य बनत चालले आहे.
आपल्याकडची कमी होत चाललेली पाण्याची पातळी,
उत्पादनवाढीसाठी पाण्याचे प्रभावी नियोजन, पाण्याचा
अनिबंध वापर केल्यामुळे ढासळत चाललेला जमिनीचा
पोत या सर्वांचा विचार करता आता ठिबक सिंचन
प्रणाली शेती क्षेत्रात एक महत्त्वाचा घटक बनत चालले
आहे.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना मिळणारा नुकसान भरपाई

वरील लिंक वर क्लीक करून वाचा


शासन दरबारी देखील Thibk sichan anudan प्रणालीचा वापर
वाढावा तसेच यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे या
अनुषंगाने अनेक योजना राबविल्या जात आहेत.
शेतकऱ्यांना ठिबक संच उपलब्ध करून देण्यासाठी
दरवर्षी केंद्र सरकार कडून प्रधानमंत्री कृषी सिंचन
योजना मार्फत अनुदान दिले जाते तसेच राज्य
सरकारच्या मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना द्वारे
जवळपास जिल्ह्यातील पंधरा हजार शेतकऱ्यांना 80
टक्के अनुदानावर ठिबक सिंचन संच उपलब्ध करून
दिला जातो.
ज्या शेतकरी बांधवांना ठिबक सिंचन प्रणालीचे अनुदान
प्राप्त करायचे असेल त्यांना महाडीबीटी या शासनाच्या
पोर्टल वर जाऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज जमा करावा
लागतो. संबंधित शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन प्रणाली
बसवली आहे की नाही याची खातरजमा केल्यानंतर या
योजनेचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले
जाते. या योजनेअंतर्गत करमाळा तालुक्यातील काही
शेतकऱ्यांना अवघ्या बोटावर मोजण्याइतक्या
दिवसातच अनुदान दिले गेले आहे.


राज्य सरकारचे मुख्यमंत्री शाश्वत योजनेअंतर्गत मोठ्या
शेतकऱ्यांना 35% आणि लहान शेतकऱ्याला 35%
अनुदान पुरवले जाते. 2021-22 या वर्षासाठी
सोलापूर जिल्ह्यातून सुमारे 18 हजार शेतकऱ्यांनी
Thibk sichan anudan अर्ज केला होता यापैकी
सुमारे आठ हजार 500 शेतकऱ्यांना अनुदान देण्यात
आले. या शेतकऱ्यांना एकूण 22 कोटींचे अनुदान
देण्यात आले आहे. या चालू वर्षासाठी आता सुमारे 70
कोटींचे अनुदान लागणार असल्याचे अधीक्षक यांनी
नमूद केले आहे.

एअर इंडिाया मध्ये नोकरी भरती

Duppt Nuksan Bhrpae /शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *