Shetkari yojana /शेतकऱ्यांना मिळणार बियाणे साठी पैसे असा घ्या लाभ

महाडीबीटी पोर्टल योजना:- अर्ज एक,योजना अनेक
(महाडीबीटी पोर्टल Shetkari yojana या घटकासाठी शेतकऱ्यांचे अर्ज घेण्यास सुरवात)
.
महा-डीबीटी पोर्टलवर “शेतकरीयोजना”या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ “एकाच
अर्जाद्वारे” देण्याच्या दृष्टिने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित
केलेली आहे.

ही पण बातमी वाचा या जिल्ह्यातील शेतपिकांचे पंचनामे होणार

या प्रणालीद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पसंतीच्या बाबींच्या निवडीचे स्वातंत्र्य देण्यात आले असून शेतकऱ्यांनी शेती निगडीत विविध बाबींकरिता अर्ज करावयाचा आहे.

राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर “शेतकरी योजना” या शीर्षकाअंतर्गत “बियाणे” या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सुविधे अंतर्गत लाभार्थीनी राष्ट्रीय अन्न
सुरक्षा अभियान या योजनेतील सोया, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इत्यादी अनुदानावर बियाणे उपलब्ध
होणार असून १५ मे २०२१ पर्यंत शेतकऱ्याने अर्ज करणे बधनकारक आहे.

महा-डीबीटी पोर्टलचे https://mahadbtmahait.gov.in/संकेतस्थळ आहे.या संकेतस्थळावरील “शेतकरी योजना” हा पर्याय निवडावा.शेतकरी स्वतःच्या मोबाईल, संगणक/लॅपटॉप/टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र (CSC), ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्र इ. माध्यमातून उक्त संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. “वैयक्तिक लाभार्थी” म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल.

Shetkari yojana

ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी व सदर नोंदणी क्रमांक महा-डीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनांसाठी अर्ज करता येईल.

अशा अर्जदारांना अनुदान वितरीत करण्यापूर्वी महा-डीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही.

सदर कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकता तसेच यामध्ये कोणतीही
तांत्रिक अडचण आल्यास [email protected] या ई-मेल वर किंवा ०२०-२५५११४७९ या दूरध्वनी
क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *