शासन निर्णय

या योजनेचा निधी आला थेट बँक खात्यात जमा होणार

नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र मराठी
Written by aamhishetkaree

.
प्रस्तावना:-
हवामान बदलास अतिसंवेदनशील असलेल्या विदर्भ व मराठवाड्यातील ४२१० गावे तसेच विदर्भातील पूर्णा नदीच्या खो-यातील खारपाण पट्ट्यातील ९३२ गावे अशा एकूण ५१४२ गावांमध्ये ६ वर्ष कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुमारे रू. ४००० कोटी अंदाजित खर्चाचा नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना मिळणार या योजनेवर शेताला कुंपण

या प्रकल्पाच्या माध्यमातून सदर गावांमध्ये हवामान बदलास अनुकूल शेती पध्दती विकसित करण्याच्या हेतूने प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये टप्याटप्याने प्रकल्प राबविण्यात येत असून गावांचे सूक्ष्म नियोजन, आराखडे तयार करुन प्रकल्पाची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. या प्रकल्पांतर्गत निवडलेल्या गावांमध्ये विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता संदर्भ क्रमांक २ च्या पत्रांन्वये प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प यांचेकडून निधी वितरणाबाबतचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे.

यादी इथे क्लीक करून नक्की पहा

सबब, प्रकल्पाच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी रु.२५० कोटी एवढा निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याबाबत शासन पुढीलप्रमाणे निर्णय घेत आहे :-

ही पण बातमी वाचा यांचा बँक खात्यात 1500 रुपये जमा होतील

शासन निर्णय:
१ सन २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प, मुंबई यांना प्रकल्पांतर्गत विविध बाबींची अंमलबजावणी करण्याकरिता रु.२५० (रु.दोनशे पन्नास कोटी फक्त) निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीद्वारे वितरण करण्यास मान्यता देण्यात येत असून सदर वितरीत करण्यात येत असलेल्या निधीपैकी बाहय हिश्श्याच्या व राज्य हिश्श्याच्या निधीचा तपशील
खालीलप्रमाणे आहे:-

About the author

aamhishetkaree

Leave a Comment