Pikvima Yojana 2023 /पाठपुराव्याला यश शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात

पाठपुराव्याला यश, तूर पीकविमा धारक शेतकऱ्यांना २५% आगाऊ Pikvima Yojana 2023 देण्याची अधिसूचना निर्गमित

१८ नोव्हेंबर रोजी मी लातूर चे जिल्हाधिकारी श्री पृथ्वीराज बी पी यांना निवेदन देऊन २०२१ खरीप हंगामात तूरीच्या संभाव्य उत्पादनात ५०% पेक्षा अधिक घट होण्याची शक्यता लक्षात घेऊन विमाधारक शेतकऱ्यांना २५% आगाऊ पीकविमा देण्याचे आदेश विमा कंपनीला द्यावेत अशी मागणी केली होती. ८ डिसेंबर रोजी औसा येथे मा जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत मी पुन्हा तोच विषय उपस्थित केला होता. माझ्या विनंतीवरून मा जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांना सोबत घेऊन औसा मतदारसंघातील तूरीची पाहणीही केली.

Pikvima Yojana 2023

ही पण बातमी वाचा shet rasta kayda असा मिळवा तुमच्या शेतासाठी रस्ता

तूरीच्या उत्पादनात ५०% पेक्षा अधिकची घट निदर्शनास आल्यानंतर मा जिल्हाधिकाऱ्यांनी पीकविमा धारक शेतकऱ्यांना २५% आगाऊ पीकविमा द्यावा असे आदेश विमा कंपनीला अधिसूचना निर्गमित करुन दिले आहेत. मा जिल्हाधिकारी यांचे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आभार. विमा कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करावी यासाठी पाठपुरावा सुरुच राहील.

10 वी आणि 12 वी निकला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *