शेतकरी योजना 2022 100 टक्के अनुदान / Orchard scheme


भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड।Orchard scheme  योजना अंमलबजावणी सुचना

फळबाग योजना 2021 / 100 टक्के अनुदान Orchard scheme

प्रस्तावना:


राज्यामध्ये सन १९९० पासून रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड    Orchard scheme योजना राबविण्यात आली असून
सदर योजनेअंतर्गत अर्थसहाय्य देणे टप्या-टप्प्याने बंद केले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत “जॉबकार्ड धारण करणारे अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आणि अनुसूचित जाती-जमातीचे शेतकरी’ फळबाग लागवडीकरीताOrchard scheme दोन हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत अनुदानास पात्र आहेत. सबब, राज्यामध्ये ८० टक्के अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी असूनही, जॉबकार्ड नसल्याने ते सदर योजनेचा लाभ मिळण्यास अपात्र ठरत आहेत. तसेच केंद्र शासनाने सन २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे निश्चित केले आहे.।

ही योजना शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याच्या दृष्टिने
सहाय्यभूत ठरणार आहे. तसेच योजनेच्या माध्यमातून पिक व पशुधन याबरोबरच फळबागेच्या Orchard scheme रुपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध होणार आहे. त्याचप्रमाणे फळबाग लागवडीमुळे नैसर्गिक संसाधनाचे संवर्धन करुन काही प्रमाणात हवामान बदल व ऋतु बदलाची दाहकता व तिव्रता सौम्य करण्यास मदत होणार आहे.

उपरोक्त पार्श्वभूमीवर भाऊसाहेब फळबागOrchard scheme लागवड योजना सन २०१८-१९ च्या खरीप हंगामापासून राज्यात
राबविण्यात येत आहे.

(१) योजनेत सहभागी होण्याची कार्यपद्धती :

१.१ राज्य/जिल्हास्तरावरुन वर्तमानपत्रामध्ये दरवर्षी माहे एप्रिलमध्ये जाहीरात प्रसिद्ध करुन तसेच अन्य माध्यमाद्वारे
पुरेशी प्रसिद्धी देऊन इच्छुक शेतकऱ्यांचे अर्ज मागविण्यात येतील.

१.२ इच्छुक शेतकऱ्यांनी जाहिरात दिल्यापासून किमान २१ दिवसात अर्ज सादर करावा.

१.३ योजनेअंतर्गत तालुक्यास दिलेल्या आर्थिक लक्षांकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास तालुकानिहाय सोडत काढून प्राधान्यक्रम यादी करुन लाभार्थी निवड करण्यात येईल.

१.४ लाभार्थी निवडीसाठी सोडतीचे ठिकाण, दिनांक व वेळ या बाबी तालुका कृषि अधिकारी आणि उपविभागीय कृषि धिकारी हे संयुक्तपणे निश्चित करतील.

१.५ तालुक्यास नेमून दिलेल्या आर्थिक लक्षांकापेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्यास त्या तालुक्यासाठी पुन:श्च जाहीरात देवून
८ दिवसात अर्ज मागविले जातील.प्राप्त होणाऱ्या अर्जामूधन विहीत कार्यपद्धतीनुसार लाभार्थी निवड करण्यात येईल.

१.६ तालुक्यामध्ये दुसऱ्यांदा संधी देऊनही लक्षांकापेक्षा कमी अर्ज प्राप्त झाल्यास जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी
सदर तालुक्याच्या शिल्लक निधीचे फेर वाटप जिल्हयामधील अन्य तालुक्यांना त्यांच्या मागणीच्या प्रमाणात करावे.
सदरची कार्यवाही अर्ज सादर करावयाच्या मुदतीनंतर १५ दिवसांत पुर्ण करावी.

१.७ त्याचप्रमाणे जिल्हयाचा निधी शिल्लक राहत असल्यास विभागीय कृषि सहसंचालक यांनी प्रथमत: विभागातील
अन्य जिल्हयास त्यांच्या मागणीच्या प्रमाणात शिल्लक निधीचे फेर वाटप करावे.

१.८ फेरवाटपानंतर विभागातील निधी शिल्लक राहत असल्यास त्याचे कृषि आयुक्तालयस्तरावरुन मागणी असलेल्या अन्य विभागातील जिल्हयांना वितरण आयुक्त कृषि यांच्या मान्यतेने संचालक फलोत्पादन करतील.

१.९ निवड झालेल्या लाभार्थ्यांनी २ दिवसात आवश्यक ती कागदपत्रे सादर करावीत.

१.१० कागदपत्रे प्राप्त होताच लाभार्थ्यांना पूर्वसंमती प्रदान करण्यात येईल. तसेच लाभार्थ्यांच्या इच्छेनुसार त्यांना शासकीय अथवा कृषि विद्यापीठाच्या रोपवाटिकेतून कलमे / नारळ रोपे उचल करण्याचा परवाना देण्यात येईल.

१.११ लाभार्थ्यांनी पूर्वसंमती मिळाल्याच्या दिनांकापासून ७५ दिवसामध्ये सर्व बाबींसह फळबागेची लागवड करणे
आवश्यक राहील.

ही पण बातमी वाचा घर किंवा शेती 200 रुपयेत होणार नाव वर/ फक्त यांची च होणार

वरील लिंक वर क्लीक करून वाचा

१.१२ पूर्वसंमती प्राप्त लाभार्थ्यांने ७५ दिवसामध्ये फळबागेची लागवड केली नाही तर त्याची पूर्वसंमती रद्द समजण्यात येईल आणि प्रतिक्षा यादीतील आद्यक्रमानुसार पात्र लाभार्थीची निवड करण्यात येईल.

(२) क्षेत्र मर्यादा :


२.१ या योजनेअंतर्गत फळबाग लागवडीकरीता कोकण विभागासाठी किमान ०.१० हेक्टर ते कमाल १०.०० हेक्टर तर उर्वरीत विभागासाठी किमान ०.२० हेक्टर ते कमाल ६.०० हेक्टर क्षेत्र मर्यादा अनुज्ञेय राहील.

२.२ कमाल क्षेत्रमर्यादेत लाभार्थी त्याच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळपिके लागवड करु शकेल.

२.३ लाभधारकाचे ७/१२ च्या नोंदीनुसार, लाभार्थी जर संयुक्त खातेदार असेल तर संयुक्त खात्यावरील त्याच्या नावे
असलेल्या क्षेत्राकरीता लाभ देण्यात यावा.

ही पण बातमी वाचाhttp://abmarathi.com/

२.४ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी याजनेमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना या (MREGS) योजनेचा
दोन हेक्टर क्षेत्रापर्यंत लाभ घेतल्यानंतर उर्वरीत क्षेत्रासाठी भाऊसाहेब फुडकर फळबाग लागवड योजनेमूधन लाभ
घेता येईल.

२.५ लाभार्थ्याने यापूर्वी राज्य रोजगार हमी योजनेशी निगडीत फळबाग लागवड वा अन्य योजनेअंतर्गत लाभ
घेतला असल्यास सदर लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरीत कमाल क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभार्थी पात्र राहील.
(३) लाभार्थी पात्रतेचे निकष :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *