online form nuksan bharpai / नुकसान भरपाई वाटप सुरू

अतिवृष्टी नुकसानभरपाईसाठीच्या आपल्या पाठपुराव्यास यश; online form nuksan bharpai

परभणी तालुक्यात जुलै २०२१ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जनावरे वाहून गेलेल्या शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने ११ लाख ८८ हजार रूपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे़. या नुकसानभरपाई धनादेशाचे आज माझ्या हस्ते वाटप करण्यात आले.

या धनादेश वितरण प्रसंगी तहसीलदार संजय बिरादार, शिवसेना तालुका प्रमुख नंदकुमार अवचार, मनपा गटनेते चंदू शिंदे, नगरसेवक प्रशांत ठाकूर, बाजार समिती सदस्य फैजुल्ला पठाण, प्रा. गजानन काकडे, गौतम भराडे आदि उपस्थित होते.

ही पण बातमी वाचा शेताला असा मिळवा रस्ता

वरील लिंक वर क्लीक करून

online form nuksan bharpai

परभणी तालुक्यातील अनेक गावांमध्ये या वर्षी जुलै महिन्यात जोरदार अतिवृष्टी झाली होती. या अतिवृष्टीमुळे नदी, नाल्यांना पूर येऊन या पुराच्या पाण्यात शेतकऱ्यांची पाळीव जनावरे वाहून गेली होती. अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजाला आर्थिक नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी शासनाकडे सतत पाठपुरावा केला होता. वेळोवेळी शासनास पत्रव्यवहाराद्वारे भरपाई देण्यासंदर्भात विचारणा केली होती.

ही पण बातमी वाचा आधार कार्ड वरील जुना फोटो बदल

वरील लिंक वर क्लीक करून नक्की पहा

अनेक प्रयत्नानंतर अखेर शासनाच्या वतीने परभणी तालुक्यातील शेतकऱ्यांना ११ लाख ८८ हजार रूपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे़. एका कार्यक्रमात यापैकी काही शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वितरण आज करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *