या 25 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळणार

शासन निर्णयः
“तौक्ते ” चक्रीवादळामुळे बहुवार्षिक पिकांचे नुकसान, मृत जनावरांसाठी मदत, पुर्णत: नष्ट/अंशत: पडझड झालेली कच्ची/पक्की घरे, मत्स बोटी व जाळयांसाठी अर्थसहाय्य, मत्सबीज शेतीसाठी अर्थसहाय्य, दुकानदार व टपरीधारक यांना नुकसानीसाठी मदत व इतर अनुज्ञेय बाबींकरिता बाधितांना मदतीचे वाटप शासन निर्णय क्रमांक: सीएलएस-२०२१/प्र.क्र.१३८/म-३
करण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून या शासन निर्णयासोबत जोडलेल्या
सहपत्रात दर्शविल्याप्रमाणे एकूण रु १७०७२.७३ लाख (अक्षरी रुपये एकशे सत्तर कोटी बहात्तर लाख व्याहत्तर
हजार फक्त) इतका निधी विभागीय आयुक्त यांचेमार्फत जिल्हयांना वितरीत करण्यास शासन 2/5 येत आहे.

२. या शासन निर्णयासोबत जोडलेल्या सहपत्राप्रमाणे लेखाशीर्षनिहाय निधी बीम्स प्रणालीवर विभागीय
आयुक्त यांना कार्यासन म-११ यांनी तात्काळ वितरित करावा.

३. वरील निधी खर्च करताना संदर्भाधीन सर्व शासन निर्णयातील सुचनांचे व निकषांचे काटेकोरपणे पालन
करण्यात यावे. संदर्भाधीन क्रमांक ३ येथील दिनांक ०३.०६.२०२१ च्या शासन निर्णयान्वये मदतीचे वाढीव दर
मंजूर करण्यात आले आहेत. त्या वाढीव दरापैकी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या (SDRF) संदर्भाधीन क्रमांक १
वर येथील शासन निर्णयातील दराने मदत प्रदान करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या लेखाशीर्षाखाली
वितरित करण्यात आलेला निधी खर्च करण्यात यावा आणि वाढीव मंजूर दर वजा राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे
दर यातील फरकाच्या मदतीची रक्कम राज्य शासनाच्या निधीमधुन वितरित करण्यात आलेला निधीतून
भागविण्यात यावा. ज्या प्रयोजनासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे त्याच प्रयोजनासाठी सदर निधी खर्च
करण्यात यावा.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रु हेक्टरी

8.
पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत. या शासन निर्णयान्वये संपूर्ण रक्कम
बीम्स प्रणालीवर वितरित करण्यात येत असली तरी, लाभार्थी निश्चित झाल्यानंतर वित्तिय शिस्तीच्या
दृष्टीकोनातून संबंधित जिल्हाधिकारी यांनी प्रत्यक्ष गरजेनुसारच कोषागारातून रक्कम आहरित करून त्यानंतरच
रक्कम लाभार्थ्यांच्याथेट बँक खात्यामध्ये ऑनलाईन पध्दतीने हस्तातंरित करण्याबाबत दक्षता घ्यावी. सदर निधी
अनावश्यकरित्या कोषागारातून आहरित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येवू नये. या आदेशान्वये मंजूर
करण्यात आलेल्या अनुदानाच्या मर्यादेतच खर्च करण्यात यावा. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पुर्ण
झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्हयांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा. या सर्व
सुचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील.

५. सदर निधीतून करण्यात येत असलेल्या खर्चाचे लेखे निधी आहरित करण्यात येणाऱ्या कार्यालयाच्या
स्तरावर ठेवण्यात यावे व करण्यात आलेल्या खर्चाचा कोषागार कार्यालये व महालेखापाल कार्यालयाशी त्रैमासिक
ताळमेळ घेण्यात यावा. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून तसेच राज्य शासनाच्या निधीमधून उपलब्ध करून
दिलेला उपरोक्त निधी खर्ची पडल्यानंतर तातडीने निधीची उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधितांकडून प्राप्त करून
घेवून एकत्रितरित्या शासनास सादर करण्याची जबाबदारी विभागीय आयुक्त यांची राहील.

६. वरील प्रयोजनासाठी प्रधान लेखाशीर्ष २२४५ – नैसर्गिक आपत्तीच्या निवारणासाठी अर्थसहाय, ०२ पुर
चक्रीवादळे इत्यादी अंतर्गत वरील विवरणपत्रात दर्शविलेल्या सर्व उप/गौण शिर्षाखाली निधी उपलब्ध करून
देण्यात येत आहे.

७. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक : २२२/२०२१/व्यय-९, दिनांक
१०.०६.२०२१ अन्वये मिळालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.