पिक व्यवस्थापन

बियाणे वितरित करणे साठी अर्ज भरणे सुरू

नवीन योजना 2020
Written by aamhishetkaree

प्रेसनोट
महाडीबीटी पोर्टलवर प्रमाणित बियाणे वितरण, पीक प्रात्यक्षिके व बियाणे मिनिकीट या घटकासाठी
शेतकऱ्याचे अर्ज घेण्यास सुरवात सन २०२१-२२ मध्ये राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके, गळीतधान्य व व्यापारी पिके अंतर्गत खरीप हंगामामध्ये प्रमाणित बियाणे वितरण,पीक प्रात्यक्षिके व बियाणे मिनिकीट या बाबींसाठी इच्छुकशेतकऱ्यांचे महाडीबीटी प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

शेतकऱ्यांनी नोंदणी करण्यासाठी दि.२० मे,
२०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. दि. २० मे, २०२१ पर्यंत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचाच विचार
केला जाईल.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके, गळीतधान्य व व्यापारी पिके कार्यक्रम खालील नमूद
जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येतो.

भात – नाशिक, पुणे, सातारा, नागपुर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली कडधान्य-राज्यातील सर्व जिल्हे
भरडधान्य (मका) – नाशिक, धुळे, जळगाव,अहमदनगर, सांगली, औरंगाबाद, जालना पौष्टिक तृणधान्य – ठाणे, पालघर,रायगड, रत्नागिरी, नाशिक,धुळे, नंदुरबार,जळगाव,
अहमदनगर, पुणे, सोलापूर,सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली,बुलढाणा, अकोला ,वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली

• गळीतधान्य – नाशिक, धुळे, अहमदनगर, पुणे, सांगली, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर

व्यापारी पिके (कापूस)- नागपुर, वर्धा, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशीम, बुलढाणा, यवतमाळ, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, अहमदनगर, धुळे जळगाव

बियाणे वितरण-
वरीलप्रमाणे नमूद केलेल्या जिल्ह्यांमध्ये भात बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास रु. २०/- प्रती किलो, १० वर्षावरील वाणास रु. १०/- प्रती किलो. कडधान्य बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास रु.५०/- प्रती किलो, १० वर्षावरील वाणास रु.२५/- प्रती किलो. संकरीत मका व बाजरी बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास रु. १००/- प्रती किलो, ज्वारी व बाजरी सरळ वाणाचे बियाण्यासाठी १० वर्षाआतील वाणास रु.३०/- प्रती किलो, १० वर्षावरील वाणास रु. १५/- प्रती किलो. सोयाबीन बियाण्यासाठी १० ते १५ वर्षाचे वाणास रु.१२/- प्रती किलो. एकूण किंमतीच्या ५० टक्के मर्यादेत अनुदान देय आहे. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला २ हेक्टर मर्यादेत लाभ देय आहे.

पीक प्रात्यक्षिके-
पीक प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला १ एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान उपलब्ध करून
दिले जाणार आहे.

बियाणे,जैविक खते, सुक्ष्ममूलद्रव्ये, भू सुधारके व पीक संरक्षण औषधे या निविष्ठांसाठी शेतकऱ्याला एक एकरच्या मर्यादेत एका पिकासाठी संबंधीत पिकाच्या प्रकारानुसार रु. २०००/- ते ४०००/- प्रती एकर मर्यादेत DBT तत्त्वावर अनुदान अदा करण्यात येणार आहे.

यासाठी कृषि विद्यापीठांचे शास्त्रज्ञांचे
सल्ल्याने जिल्हानिहाय पॅकेज तयार करण्यात येत असून संपूर्ण पॅकेजचा वापर करणे अनिवार्य आहे.
बियाणे मिनिकीट-

महत्त्वाची सूचना – सोयाबीन/बाजरी/ज्वारी/कापूस/मका या पिकांमध्ये मिनिकीट कडधान्याचे आंतरपीक घेणे
अनिवार्य आहे.

ही पण बातमी वाचा जुनेता जुने शेतीचे कागपत्रे पहा मोबाईल वर

बियाणे मिनिकीट साठी जिल्हे-
तूर – औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, वाशीम अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपुर, जळगाव, नंदुरबार, धुळे, सांगली, सातारा, अहमदनगर, नाशिक, सोलापूर.

ही बातमी पण वाचा या तारखे पर्यंत सर्वांना मिळणार घरकूल

• मुग- जळगाव, धुळे, अहमदनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी, हिंगोली, बुलढाणा, अकोला, अमरावती
उडीद – अहमदनगर, बीड, नांदेड, उस्मानाबाद, बुलढाणा, अकोला निवड झालेल्या शेतकऱ्यांना खरीप हंगाम २०२१ मध्ये तूर, मुग आणि उडीद यापैकी एका पिकाचे ४
किलोचे एक बियाणे मिनिकीट देण्यात येईल.

तूर – रु. ४१२/- प्रती ४ किलो मिनिकीट, मुग – रु. ४०७/- प्रती ४ किलो मिनिकीट, उडीद – रु. ३४९/- प्रती ४ किलो मिनिकीट प्रमाणे अनुदान देय असून बियाणे मिनिकीटची
किंमत अनुदानापेक्षा जास्त असल्यास जास्तीची रक्कम शेतकऱ्यांनी अदा करावयाची आहे.

शेतकऱ्यांची निवड ऑनलाईन लॉटरी पद्धतीने होणार आहे.

About the author

aamhishetkaree

Leave a Comment