Mdhumshika paln yojan / मधुमक्षिका पालन योजना अनुदान मिळणार


प्रस्तावनाः
हवामान बदलाचा राज्याच्या शेतीवर विपरीत परिणाम दिसून येत असून, भविष्यात देखील सदर परिणामांची Mdhumshika paln yojan
व्याप्ती वाढणार असल्याचे राज्याच्या हवामान बदला विषयक कृती आराखडयामध्ये नमूद केले आहे.

मराठवाडा व विदर्भातील शेतक-यांना गेल्या काही वर्षांपासून मोठया दुष्काळास सामोरे जावे लागत असून, भू-गर्भातील पाणी साठयावर व जमिनीच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.

परिणामी शेतीमधील पिकांची उत्पादकता घटत आहे.
तसेच पूर्णा नदीच्या खो-यातील भू-भाग हा निसर्गत:च क्षारपड असल्याने शेतीसाठी सिंचनास मर्यादा येत आहेत. या प्रतिकूल परिस्थितीमध्ये अल्प भू-धारक शेतक-यांच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे.

हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतक-यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र
शासनाचा जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प सुरु करण्यात आलेला आहे.

मधमाशांचे पालन व्यवस्थित केले आणि त्यापासून मिळणारा मघ एकत्रित करून तो बाटल्यात भरून विकला
तर एक एकर शेतात ठेवलेल्या मधमाशांच्या पेट्यातून वर्षाकाठी ५० हजार ते ६० हजार रुपयांचा मध जमा होऊ शकतो..

मध हे एक शक्तीदायक, पौष्टीक अन्न व औषध आहे. मधमाशांचे मेण हे सौंदर्य प्रसाधने तसेच औद्योगिक उत्पादनाचा घटक आहे. केवळ मध व मेणासाठीच नव्हे तर मधमाशांकडून होणाऱ्या परागीकरणामुळे उत्पादनात चांगल्या प्रमाणात वाद होते.

त्यामुळे प्रकल्प क्षेत्रामध्ये मधुमक्षिका पालनाद्वारे शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न मिळवून देण्यासाठी तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मिती होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत

1.मधुमक्षिका पालन ” या घटकाचा समावेश करण्यात आलेला आहे.

उद्देशः
१. नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पात समावेश करण्यात आलेल्या गाव समूहात “मधुमक्षिका पालन” या
घटकांतर्गत मधुमक्षिका पालनाद्वारे भूमिहीन व्यक्ती/ शेतकऱ्यांना पूरक उत्पन्न मिळवून देणे,

२. ग्रामीण भागातील मधुमक्षिका पालन व्यवसायास चालना मिळावी व आहारामध्ये मधाचा समावेश व्हावा.
लाभार्थी निवडीचे निकष प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठीच्या ग्राम कृषि संजीवनी समितीने (VCRMC) लाभार्थी निवडतांना भूमिहीन व्यक्ती, अत्यल्प अल्प भूधारक शेतक-यांमधील अनुसूचित जाती, जमाती, महिला, दिव्यांग व सर्वसाधारण शेतकरी या प्राधान्यक्रमाने लाभार्थाची निवड करावी.

ही पण बातमी वाचा https://abmarathi.com/?p=835

या घटकाअंर्तगत जास्तीत जास्त ५० मधुमक्षिका संच, ५० स्टैंडर्ड मधुमक्षिका पेटी व मध काढणी यंत्र व फुड ग्रेड मध
कंटेनर खरेदीसाठी अनुदान देय असून यापेक्षा कमी खरेदी केल्यास त्याच्या प्रमाणात अनुदानाचा लाभ देय आहे.(संदर्भ :- एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंमलबजावणी मार्गदर्शक सूचना सन – २०१८-१९)
अंमलबजावणीतील विविध स्तरावरील जबाबदाऱ्यालाभार्थी

2. इच्छुक लाभार्थीने घटकांतर्गत बाबींचा लाभ घेण्यासाठी

प्रकल्पाच्या https://dbt.mahapocra.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून अर्ज आवश्यक कागदपत्रासह अपलोड करावा.

3. निवडलेल्या लाभार्थीने गठीत खरेदी समितीच्या

उपस्थितीत Mdhumshika paln yojan वसाहत, संच व मध काढणी यंत्र इत्यादीची खरेदी करावी.

Navin vihir / योजने वर 100 टक्के अनुदान फक्त या शेतकऱ्यांना

३. पूर्वसंमती मिळाल्या पासून एक महिन्याच्या आत मधुमक्षिका व इतर आवश्यक बाबींची खरेदी करून ऑनलाईन अनुदान मागणी करावी.

4. मधुमक्षिका पालनासाठी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील.

५. मधुमक्षिकापालन या घटकांतर्गत अनुदान मिळणेसाठी ऑनलाईन मागणी उपविभागीय कृषि अधिकारी यांचेकडे
करावी. सोबत खरेदी देयकांच्या मूळप्रती व खरेदी समितीचे प्रमाणपत्र लाभार्थ्याने स्व:साक्षांकीत करुन ऑनलाईन अपलोड करावे.

ही पण बातमी वाचा Pm किसान योजनेतुन या शेतकऱ्यांना हटवला / यादी मध्ये नाव पहा

5.मधुमक्षिका खरेदी समिती:


१.सरपंच- अध्यक्ष
२.उपसरपंच-सदस्य
३.इतर ग्राम कृषि संजीवनी समिती (VCRMC) महिला सदस्य – सदस्य
४.कृषि मित्र/कृषि ताई – सदस्य
५.कृषि सहाय्यक – सचिव
(अनुक्रमांक १,२,३ पैकी किमान १ सदस्य, कृषि मित्र/कृषि ताई, कृषि सहाय्यक व लाभार्थी यांची खरेदीच्या वेळी उपस्थिती अनिवार्य) खरेदी समितीच्या कार्य व जबाबदाऱ्या:

१. खरेदी समितीने मधुमक्षिका खरेदी कोठून व कोणत्या प्रकारे/पद्धतीने करावयाची आहे, याबाबत निर्णय उपविभागीय कृषि अधिकारी यांचे मार्गदर्शनानुसार घ्यावा,

6. गावातील निवड झालेल्या पात्र सर्व लाभाथ्यांची मधुमक्षिका वसाहत, संच व मध काढणी यंत्र यांची खरेदी शक्यतो एकाचवेळी करावी.

३. लाभार्थीनी खरेदी केली असल्याबाबतचे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र खरेदी समितीने सादर करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *