पीकविमा 2020

Live पीकविमा अपडेट

Written by aamhishetkaree

बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर जळगाव व शेगाव तालुक्याला ६४ कोटी ७ लाख २१ हजार रुपये पिक विमा मंजूर…
२६ जुलै रोजी पुणे कृषी आयुक्त कार्यालयावर स्वाभिमानीच्या आंदोलनांच्या दणक्याने २०२० चा पिक विमा मंजूर…
संग्रामपूर : खरिप २०२० चा पिक विम्याच्या प्रश्नावर शेतकऱ्यांना हक्काचा पिक विमा मिळण्यासाठी गेल्या १० महिन्यापासून तालुका स्तरा पासून तर उपविभागीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालयावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सतत आंदोलने केले. आंदोलनामधे ३७० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांच्या अंगावर पोलिस केसेस दाखल झाल्या आहेत.


पिक विमा मंजूरसाठी कंपनी कडून दिरंगाई होत असल्याने मुंबईमधे पावसाळी अधिवेशनात. राजभवना समोर आंदोलन केले. पंरतु पिक विम्याचा विषय सभागृहात विधानसभेच्या पटलवार येऊ न देता कंपनी कडून कमीशन घेऊन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्याच महापाप या लोकप्रतिनिधींनी केले आहे.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांनी असा मिळावा पिकविमा

आणि म्हणून आम्ही परीणामाची चिंता न करता शेकडो शेतकऱ्यांनासह पुणे येथे २६ जुलै ला कृषी आयुक्तालय कार्यालयावर आंदोलन सुरू केले. या आंदोलनामध्ये मा.खा.राजु शेट्टी साहेब यांनी विशेष लक्ष घालून पिक विमा प्रश्नावर तोडगा निघाला नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा यावेळी देण्यात आला. त्यामुळे मा. कृषीमंत्री दादासाहेब भुसे यांचे सुचनेनुसार कृषी आयुक्त यांनी तत्काळ बैठक घेतली. आणि बैठकीत प्रशांत डिक्कर यांनी विरोध करणाऱ्यांच्या नाकावर टिच्चून संग्रामपुर जळगाव व शेगाव तालुक्यासाठी पिक विमा मंजूर करून घेतला. त्यामुळे संग्रामपूर जळगाव व शेगाव तालुक्यासाठी ६४ कोटी ७ लाख २१ हजार रुपये शेतकऱ्यांचे बॅंक खात्यावर लवकरच जमा होणार आहेत…

About the author

aamhishetkaree

Leave a Comment