Kisan credit card loan /शेतकऱ्यांना सरकार देणार 3 लाख रुपये कर्ज

दुध उत्पादक सभासद यांचे करीता किसान क्रेडीट कार्ड योजना विशेष मोहीम १ 

नोकरी साठी अर्ज करा

Kisan credit card loan
केंद्र शासनाने घोषीत केलेल्या विशेष मोहीमे अंतर्गत प्राथमिक दुध उत्पादक सहकारी संस्थेतील सर्व दुध उत्पादक सभासदांना व खाजगी दुध उत्पादक शेतकरी यांना किसान क्रेडीट कार्डव्दारे पशुपालन करिता ३ लाखापर्यंत कर्ज त्यांचे नजीकचे बँकेमार्फत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
सदर कर्ज रक्कमेवरील व्याजावर ३% अनुदान व नियमित कालावधीत कर्जफेड केल्यास २ % अतिरिक्त व्याज अनुदान शासनाकडून देण्यात येईल. तरी सर्व दुध उत्पादक सभासदांनी संस्था सचिव व खाजगी दुध सेंटर चालक यांचेशी संपर्क साधून आपले कर्ज मागणीचे अर्ज तात्काळ संस्था अथवा सेंटर चालक यांचेकडे सादर करावेत.

ही पण बातमी वाचा आज शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात थेट जमा होणार

Kisan credit card loan

अर्जासोबत लागणारे कागदपत्र : १) आधार कार्ड २)बँकेत खाते असलेल्या बँकेचे नाव,शाखा व बँक खाते क्रमांक ३)२ पासपोर्ट फोटो ४)७/१२ उतारा ५)किसान क्रेडीट कार्ड (पिक कर्जासाठी मिळालेले
असल्यास) त्याचा तपशील.
अधिक माहितीकरीता आपल्यादुध संघ/प्रकल्पाशी संपर्क साधावा.

सहाय्यक निबंधक जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी
अहमदनगरसहकारी संस्था (दुग्ध)अहमदनगर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *