शासन निर्णय

या शेतकऱ्यांना मिळणारा 2 लाख रु

नाबार्ड कर्ज योजना महाराष्ट्र मराठी
Written by aamhishetkaree

कोणते शेतकऱ्यांना मिळणार 2 लाख रु

राज्यात शेती व्यवसाय करतांना वीज पडणे, पूर, विजेचा शॉक बसणे इ. नैसर्गिक आपत्ती, सर्पदंश, विंचूदंशमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे होणारे अपघात, यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहीना अपंगत्व येते.

घरातील कर्त्या व्यक्तिस तसेच त्याच्या कुटुंबातील सदस्यास झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते.

हे 2 लाख रु कोणाला मिळणार

अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस व त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरिता राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व शेतकऱ्याच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला कोणताही १ सदस्य (आई-वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा व अविवाहीत मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) असे १० ते ७५ वयोगटातील एकुण २ जणांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यास संदर्भ क्र. (१) येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

ही पण बातमी वाचा या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारा अनुदान

सुधारीत स्वरुपातील गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यासाठी संदर्भ क्र. (२) येथील शासन परिपत्रकान्वये कार्यपद्धती व मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

नवीन मतदान यादी आली इथे क्लीक करून नक्की पहा

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राज्यामध्ये राबविण्यासाठी युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीची व ऑक्झॉलियम इन्शुरन्स ब्रोकिंग, प्रा. लि या विमा

त्यानुसार विमा कंपनीस विमा हप्ता अदा केल्यानंतर एक वर्षाच्या कालावधीत योजना राबविण्यासाठी विमा कंपनी व विमा सल्लागार कंपनी यांची नियुक्ती करणे तसेच विमा
हप्ता व विमा ब्रोकरेज निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

महाराष्ट्र शासनाचा निर्णय

शासन निर्णय:-
“गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सन २०२१-२२ मध्ये राबविण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत असून संबंधित विमा कंपनीला विमा हप्त्याचे प्रदान केल्यापासून १२ महिन्याच्या कालावधीकरीता विमा योजना चालू ठेवण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

२. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना संपुर्ण राज्यामध्ये दि युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरंन्स कंपनी लि. या विमा कंपनीमार्फत प्रति शेतकरी प्रति वर्ष रु.२९.०७ इतक्या विमा हप्ता दराने (विना ब्राकरेज) व ऑक्झॉलियम इन्शुरंन्स ब्रोकिंग, प्रा. लि. या विमा सल्लागार कंपनीमार्फत ठाणे, नाशिक, अमरावती व नागपूर या महसूल विभागासाठी ०.०६५ टक्के तर पुणे व औरंगाबाद या महसूल विभागासाठी ०.०७० टक्के इतका विमा ब्रोकरेज दराने राबविण्यास
शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

३. सन २०२१-२२ मध्ये विमा हप्ता रकमेचे विमा कंपनीला प्रदान झाल्यापासून १२ महिने इतक्या कालावधीकरीता राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व त्यांच्या
कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेला एक सदस्य यांना विविध अपघातांपासून संरक्षण देण्यासाठी विमा कंपनीला व विमा सल्लागार कंपनीस अदा करावयाची विमा हप्ता रक्कम व विमा ब्रोकरेज रक्कम तसेच आयुक्त कार्यालयास कार्यालयीन खर्चासाठी रक्कम पुढील तक्त्यात दर्शविल्या प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

महाराष्ट्र शासन GR

अ.क्र. विमा कंपनी/ कृषि आयुक्त कार्यालय शेतकरी/ रक्कम (रुपये) कुटुंबातील सदस्य दि युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरंन्स
८८,३७,२८,०००/-
कंपनी लि.
ऑक्झॉलियम इन्शुरंन्स ब्रोकिंग, प्रा. लि.
५.९६,६६२/-
कृषि आयुक्त कार्यालय (कार्यालयीन खर्च)
८०,०००/-
एकूण
८८,४४,०४,६६२/-
१ ३.०४ कोटी
२ ३.०४ कोटी
३ विमा कंपनीस, विमा सल्लागार कंपनीस वरील तक्क्यात नमूद केल्याप्रमाणे १२ महिने

About the author

aamhishetkaree

Leave a Comment