Goglgay nusksan barpae vitran / या आठवड्यात शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात

औसा तालुक्यातील ४३ कोटी रुपयांच्या Goglgay nusksan barpae vitran भरपाईचे धनादेश आज बँकांना वितरित केले.

ड्रायव्हिंग लायसन्स काढा मोबाईल वर

आज तहसील कार्यालय, औसा येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात गोगलगाय प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या औसा तालुक्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईपोटी द्यावयाच्या ४३ कोटी ७ लक्ष रुपयांचे धनादेश ६ बँकांच्या प्रतिनिधींना वितरित केले. तालुक्यातील सुमारे ४३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम पुढील आठवड्यात प्रत्यक्षात जमा होईल. सगळ्या आस्मानी संकटांमधून जे काही थोडे बहुत सोयाबीन वाचले आहे ते काढणीला आले असून नुकसाभरपाई मिळाल्यावर शेतकऱ्यांना काढणीच्या खर्चाला हातभार नक्कीच लागेल.

शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा ! ५ हजारांपासून ५० हजारांपर्यंत बक्षीस

वीज पडून औसा तालुक्यातील मृत्युमुखी पडलेल्या ५ जनावरांच्या मालकांना नवीन जनावर खरेदीसाठी सानुग्रह अनुदानाचे धनादेशही यावेळी वितरित केले. संततधार पाऊस नुकसान भरपाईची रक्कम ही लवकरच सरकारकडून उपलब्ध होणार असून नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या पाठीशी हे सरकार भक्कमपणे उभे आहे
Goglgay nusksan barpae vitran

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *