शासन निर्णय

शेतकऱ्यांना मिळणार या योजनेवर शेताला कुंपण

Written by aamhishetkaree

शासन निर्णय :-


१. डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजने अंतर्गत वन्यप्राण्यांकडून होणारी मनुष्यहानी व शेतपिक नुकसान टाळण्यासाठी वनालगत गावांच्या वनसीमेवर प्रायोगिक तत्वावर वनविभागाव्दारे लोखंडी जाळीचे कुंपण उभारण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे.

२. सदर कार्यबाबींची अंमलबजावणी वन विभागामार्फत ज्या गावांमध्ये बाघ व बिबट यांचे प्रादुर्भाव व शेतपिक नुकसानीची प्रकरणे जास्त आहे असे निवडक गावाभोवती
असलेल्या वन सीमेवरच करण्यात येईल.

३. संबंधित ग्रामपंचायतीने वन सीमेवर योग्य त्या ठिकाणी लोखंडी जाळीचे कुंपण उभारण्याबाबत ग्रामसभेच्या ठरावासह प्रस्ताव संबंधित उपवनसंरक्षक/विभागीय वन
अधिकारी यांना सादर करावा.

४. ग्रामपंचायतीचा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर संबंधित उपसंचालक/उपवनसंरक्षक/ विभागीय वन अधिकारी यांनी संबंधित गावात वाघ व बिबट यांच्याव्दारे मनुष्य हानी झालेल्या प्रकरणांच्या संख्येचा व शेतपिक नुकसानीच्या प्रकरणांच्या संख्येचा आढावा घेऊन गावात वारंवार मनुष्यहानी व शेतपिक नुकसानी झाली असल्यास सदर
गावासाठी लोखंडी जाळीचे कुंपण उभारण्यासाठी सर्व आकडेवारी नमूद करून संबंधित वनसंरक्षक/मुख्य वनसंरक्षक यांना मान्यतेकरिता प्रस्ताव सादर करावा.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना मिळणार या योजने वर 10 लाख रु

५. वनसंरक्षक/मुख्य वनसंरक्षक यांनी अनुदान उपलब्धतेच्या अधीन राहून प्रस्तावाची चिकित्सक निरीक्षण करावे व प्रस्ताव संबंधित क्षेत्राचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक
(वन्यजीव) यांच्याकडे मान्यतेस सादर करावे.

६. प्रादेशिक वनवृत्त चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर वन वृत्तासाठी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पूर्व नागपूर, यवतमाळ व अमरावती वृत्तासाठी अपर प्रधान
मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती तसेच इतर उर्वरीत वन वृत्तासाठी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), पश्चिम, मुंबई हे
संबंधित अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) राहतील.

७. अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी प्रकरणाची तपासणी करुन अनुदान उपलब्धतेनुसार गावाच्या संवदेनशीलतेच्या प्राधान्यानुसार मान्यता प्रदान करावी.

सदर मान्यता प्रदान करताना वन्यप्राण्यांचे भ्रमणमार्ग बाधित होणार नाही व वन्यप्राण्यांना पाणी पिण्यास अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी मान्यता प्रदान केल्यानंतर सदर गावाचे सर्वेक्षण करून योग्य ठिकाणी लोखंडी जाळीच्या कुंपणाकरीता अंदाजपत्रक तयार
करण्याची कार्यवाही उपसंचालक/उपवनसंरक्षक/ विभागीय वन अधिकारी यांनी करावी.

८. प्रचलित मंजूर राज्य दरसूची नुसार सावर्जनिक बांधकाम विभाग (P.W.D.) च्या प्रमाणभूत मानकाप्रमाणे १.८० मी. उंचीचे लोखंडी जाळीचे कुंपण उभारण्यात यावे.

९. अंदाजपत्रकाला तांत्रिक व प्रशासकीय मान्यता प्राप्त करून वित्तीय नियमानुसार निविदा प्रकिया पूर्ण करून कामे पूर्ण करावी. कोणत्याही परिस्थितीत तार जाळी किंवा

१०.लोखंडी जाळीचे कुंपण उभारल्यानंतर सदर गावात/ गावक-यांकडून कोणत्याही वन्यप्राण्यांची शिकार केल्याची किंवा सदर लोखंडी जाळी कुंपणात विद्युत प्रवाह
सोडल्याची घटना निदर्शनास आल्यास सदर गावातील लोखंडी जाळीचे कुंपण तात्काळ काढण्यात यावे व इतर गावात आवश्यकतेनुसार लावण्यात यावे.

About the author

aamhishetkaree

Leave a Comment