Rashtriy pshudhn /शेतकऱ्यांना मिळणार या योजने वर 10 लाख रु

Rashtriy pshudhn अभियान अंतर्गत मुरघास निर्मीतीसाठी सायलेज बेलर युनीट स्थापनेकरिता अर्थसहाय्य या योजनेची
अंमलबजावणी उस्मानाबाद जिल्हयामध्ये करावयाची आहे. सर्वसाधारण योजनेअंतर्गत सदर योजनेचा लाभ जिल्हयातील सर्वसाधारण प्रवर्गातील सहकारी दुध उत्पादक संघ/संस्था ,शेतकरी उत्पादक कंपनी/संस्था स्वयंसहाय्यता बचत गट व गोशाळा/पांजरापोळ/गोरक्षण संस्था या लाभार्थी संस्थांना दयावयाचा आहे.

योजनेसाठी संस्थेची निवड करताना याच प्राधान्यक्रमाने निवड करण्यात येईल जिल्हयातील एकाच संस्थेला सदर योजनेचा लाभ दयावयाचा आहे.

ही पण बातमी वाचा PM किसान चा 7 हफ्ता या तारखील / फक्त या शेतकरी मिळणार

सदर योजनेसाठी प्रतियुनीट रू.२०.०लक्ष एवढया खर्चापैकी ५०% रू.१०.०लक्ष केंद्रशासनाचे अर्थसहाय्य असून उर्वरीत
५०% रू.१०.०लक्ष एवढी रक्कम लाभार्थी संस्थेनी स्वतः खर्च करावयाची आहे. योजनेचा लाभ दयावयाच्या संस्थेची
रू.१०.०लक्ष खर्च करण्याची क्षमता असल्याबाबतची खात्री करण्यासाठी मागील तीन वर्षाचे लेखा परीक्षण अहवाल संबधित संस्थेनी सादर करावयाचे आहे.

Rashtriy pshudhn

संस्थेच्या स्वहिस्सा निधीसाठी संस्थेच्या स्वनिधीमधून खर्च करू शकेल अथवा आवश्यकतेनुसार बँकेकडून कर्ज घेवू शकेल. बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी संबधित संस्थेची असेल

ही पण बातमी वाचा https://abmarathi.com/gharkulyojana/

मुरघास निर्मीतीसाठी सायलेज बेलर मशिन युनीटमध्ये पुढील बाबीचा समावेश आहे.१) सायलेज बेलर २)हेवी डयुटी कडबा कुटटी यंत्र ३) ट्रॅक्टर व ट्रॉली ४) वजन काटा ५) हार्वेस्टर ६) मशीन शेड. यापैकी सायलेज बेलर व हेवी डयुटी कडबा कुटटी यंत्र या मशिनरीची संस्थेनी खरेदी करणे आवश्यक असून सदरील खर्च वजा जाता रू.२०.०लक्ष मधील उर्वरीत निधीमधून संस्थेच्या आवश्यकतेनुसार इतर बाबीसाठी खर्च करता येईल.

सदर निधीमधून खरेदी केलेल्या मशिनरीची संस्थेस शासनाच्या संमतीशिवाय परस्पर विक्री करता येणार नाही. यासाठी संस्थेस रू.५००/-च्या मुद्रांकावर रितसर करारनामा करून ध्यावा लागेल. तसेच पशुसंवर्धन खात्याचे अधिकारी भेटीस आल्यानंतर संबधित अधिका-यांना सदर मशिनरी दाखवणे बंधनकारक असेल.

संस्थेनी आवश्यक मशिनरीची खरेदी केल्यानंतर संस्थेच्या बँक खात्यामध्ये सदरचा निधी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे
DBTद्वारे जमा करावयाचा आहे. योजनेचा उद्धेश मुरघास निर्मीतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी असल्याने संस्था मशिनरीच्या सहाय्याने मुरघास तयार करून केलेल्या विक्रीमधून माफक नफा मिळवू शकेल. तथापि मुरघास तयार करण्यासाठी हिरव्या चा-याचे उत्पादन अथवा खरेदी ,मजुरी खर्च ,इंधन खर्च व ईतर अनुषंगीक खर्च , मशिनरी दुरस्ती ई.बाबीवरील होणारा खर्च हा संस्थेनी स्वतः करावयाचा आहे.

तरी ईच्छूक लाभार्थीनी अर्जाच्या स्वरूपातील प्रस्ताव नजीकच्या पशुवैधकीय दवाखान्यामार्फत संबधीत
तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी ( विस्तार ) पंचायत समिती यांच्याकडे दि. पर्यंतच्या कालावधीत सादर करावे असे अवाहन करण्यात येत आहे . अर्जाचा नमुना आणि सोबत जोडावयाची कागदपत्रे , अटी
व शर्ती याबाबतचा तपशील लाभार्थीशी निगडीत असलेल्या नजीकच्या पशुवैधकीय दवाखान्यात व संबधीत तालुक्याचे पशुधनविकास अधिकारी (विस्तार ) पंचायत समिती यांच्याकडे उपलब्ध आहे.

तरी अधिकच्या माहितीसाठी संबधित तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी विस्तार व नजीकच्या पशुवैधकीय संस्थेचे
संस्थाप्रमुख यांच्याशी संपर्क साधावा. सदरील योजनेचा सर्वसाधारण प्रवर्गातील उपरोक्त लाभार्थी संस्थानी लाभ घेण्याबाबतचे
अवाहन करण्यात येत आहे
जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त
उस्मानाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *