शासन निर्णय

शेतकऱ्यांनासाठी आताची सर्वात मोठी बातमी शेतकऱ्यांना मिळणार आता 85 कोटीपीक विमा.

Written by aamhishetkaree

महाराष्ट्रतील बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता तर खरीप पिक विमा मंजूर झाला व राज्यातील 85 कोटी पिक विमा भरपाई आता शेतकऱ्यांना मिळणार आहे.?

शेतकऱ्यांनासाठी आताची सर्वात मोठी बातमी

पंतप्रधान पिक विमा योजनेतून राज्यातील एक लाख 19 हजार शेतकऱ्यांना दिवाळीत 85 कोटी रुपयांची विमा भरपाई मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे राज्याध्यक्ष 44 लाख हेक्टर जवळपास खरीप पिकांचा पेरा झाला होता ज्यादा पावसामुळे अनेक जिल्ह्यात उभ्या पिकांची तर विदर्भ मराठवाड्यात काही काढणे झालेल्या शेतमालाची मोठी हानी झाली. त्यामुळे नुसकान ग्रस्त शेतकरी विमाभरपाई कडे डोळे लावून बसले होते विमा कंपन्यांनी आतापर्यंत स्थानिक आपत्ती गटात 76 कोटी तर 9 कोटी रुपये मध्यखवधी अवस्थेतील दाव्यांचे वाटले आहेत. शेतकऱ्यांना विमा योजनेच्या मुख्य घटकातील डाव्यांच्या रकमा अजून मिळालेला नाही त्यामुळे पीक कापणी प्रयोगाचे सर्व माहिती हाती आल्यानंतर तसेच सरकार विमा हप्त्याची रक्कम ताब्यात आल्यानंतर रक्कम जमा होतील.

फेब्रुवारी अखेर मुख्य घटकातील रकमा शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होण्याचा अंदाज आहे शासन तसेच विमा कंपन्या कंपन्यांकडून याबाबत अत्यावश्यक प्रक्रिया वर कामे सुरू आहेत. अशी माहिती कृषी खात्याच्या सूत्रांनी दिली आहे.

राज्यात खरीप 2020 चा हंगामातील पीक विमा योजनेत 13 लाख 66 हजार कर्जदार शेतकरी सहभाग घेतला होता तसेच 94 लाख 12 हजार बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अर्ज दाखल केले.
त्यामुळे अर्जाची संख्या एक कोटीच्या पुढे गेली मात्र एक शेतकरी विविध कर्ज करीत असल्याने शेतकऱ्यांचे मूळ संख्या 50 लाखाच्या आत आहेत असे कृषी विभागाने म्हटले आहे.

कंपन्यांना मिळणार केंद्र-राज्य आत्ता केंद्र शासनाने कर्जदार शेतकऱ्यांना मिळणा योजना येथे केलेली आहे तरी राज्यात चांगला प्रतिसाद मिळतो आहे. 2020 च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना विमा कंपनीकडे 528 कोटी रुपयांच्या आसपास विमा हप्ता भरला आहे.

ही पण बातमी वाचा

शेतकऱ्यांना मिळणार या योजने वर 80 टक्के सबसिडी / असा करा अर्ज

महाराष्ट्रशासनाकडून शेतकऱ्यांचा विमा हप्ता अनुदानापोटी 2437 कोटी रुपये तर केंद्र शासनाकडून 2247 कोटी रुपये अनुदान विमा कंपन्यांना मिळणार आहे.
आपला शेतकरी खरीप पिक विमा याकडे डोळे लावून बसले होते आता पिक विमा फेब्रुवारी महिन्यात पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याचे संकेत दिसत आहेत तरी शेतकऱ्यांनी आता रब्बी पिक विमा काढणेही गरजेचे आहे.

About the author

aamhishetkaree

Leave a Comment