अतिवृष्टी व नुकसान भरपाई यादी 2020 शेतकऱ्यांनाचा बँक खात्यात थेट रक्कम जमा होणार
राज्यात जून ते ऑक्टोबर, २०२० या कालावधीत विविध जिल्हयात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांना मदत देण्याबाबत संदर्भाधीन शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या बाबींसाठी संदर्भाधीन शासन निर्णयान्वये विहित केलेल्या दराने संदर्भाधीन क्रमांक ३ ते ८ येथील पत्रान्वये प्राप्त झालेल्या
प्रस्तावानुसार मदत
प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.
२. या आपत्तीमध्ये शेतीपिकांच्या व बहुवार्षिक पिकांच्या झालेल्या नुकसानीसाठी खालील दराने मदत देण्यास
शासनाची मान्यता देण्यात येत आहे व शेतीपिकांच्या नुकसानीसाठी मदत बाब दयावयाची मदत मदतीची रक्कम शेतीपिकांच्या जून ते ऑक्टोबर,२०२० या कालावधीत राज्यात शासन निर्णय, दि १३.५.२०१५ बहुवार्षिक पिकांच्या अतिवृष्टी व पुरामुळे शेतीपिकांचे व बहुवार्षिक पिकांचे नुसार दयावयाच्या मदतीसाठी नुकसानीसाठी मदत | किमान ३३ % नुकसान झाले आहे अशा बाधित राज्य आपत्ती प्रतिसाद निधी
शेतकऱ्यांना शेतीपिकांच्या (जिरायत व आश्वासित सिंचना | (SDRF) मधून खर्च करण्यात खालील पिके) नुकसानीसाठी रू १०,०००/- प्रति हेक्टर यावा व वाढीव दरानुसार व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी रू २५०००/- प्रति होणारा खर्च राज्य शासनाच्या हेक्टर या दराने २ हेक्टरच्या मर्यादेत मदत देण्यात निधीमधून करण्यात यावा.
उपरोक्तप्रमाणे बाधित नागरिकांना मदतीचे वाटप करण्यासाठी राज्य कार्यकारी समितीने दिनांक
३.११.२०२० रोजी झालेल्या बैठकीत दिलेल्या मान्यतेनुसार या शासन निर्णयासोबत जोडलेल्या विवरणपत्र-अ
मध्ये नमूद केल्याप्रमाणे पहिल्या हप्त्यापोटी एकूण रू २२९७०६.३७ लक्ष (रूपये दोन हजार दोनशे सत्त्याण्णव
कोटी सहा लक्ष सदोतीस हजार फक्त) इतकी रक्कम मागणी क्रमांक सी-६, प्रधान लेखाशीर्ष २२४५- नैसर्गिक
आपत्तीच्या निवारणार्थ सहाय्य अंतर्गत विविध लेखाशीर्षाअंतर्गत, ३१ सहाय्यक अनुदाने या उदिष्टाखाली
पुनर्विनियोजनेव्दारे प्राप्त केलेल्या तरतूदीमधून वितरीत करण्यात येत आहे.
या प्रयोजनासाठी होणारा खर्च त्या
त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा. सदर निधी बीम्स प्रणालीवर म-११ कार्यासन यांनी तात्काळ वितरीत
करावा.
४. उपरोक्त निधीचे बाधितांना वाटप करताना संदर्भाधीन क्रमांक १, २ व ९ येथील शासन निर्णयातील अटी व
शर्तीचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.
५. सदर शासन निर्णय वित्त विभागाने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक २६९/व्यय-९/२०२०, दिनांक
०६.११.२०२० अन्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे.
हि बातमी पण वाचा
आता फक्त 23 रुपयेत सर्व सरकारी योजनेनांच्या अनुदान लाभ मिळणार करा असा अर्ज
६. सध्या महाराष्ट्र विधानपरिषदेच्या निवडणूकांची आदर्श आचार संहिता ज्या विभागात लागू आहे त्या विभागात
मदतीचे वाटप करताना आदर्श आचार संहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत भारत निवडणूक
आयोग, नवी दिल्ली यांनी त्यांच्या क्र.४३७/LET/ECI//FUNC/MT-LC-&T/२०२०, दि.०९.११.२०२० रोजीच्या
पत्रान्वये कळविले आहे. त्याचप्रमाणे सदर पत्रान्वये भारतीय निवडणूक आयोगाचे क्र.४६४/INST/२००७-PLN-I,
पृष्ठ ५पैकी२
शासन निर्णय क्रमांकः सीएलएस-२०२०/प्र.क्र.२१९/म-३
दिनांक ०७.०१.२००७ मधील अटींचे काटेकार पालन करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच सदरची मदत
वाटप करण्याबाबत भारत निवडणूक आयोगाने ना हरकत कळविली आहे.