Mukhymantri krushi sour panp / मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना 95 टक्के अनुदान / अर्ज भरणे चालु

मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना Mukhymantri krushi sour panp

महाराष्ट्रातील तमाम भूमिपुत्रांना नमस्कार !!

आपणास कळविण्यात

Mukhymantri krushi sour panp

येते की मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजना साठी नवीन व प्रलंबित अर्ज ऑनलाईन भारणेस चालू आहे. सदर योजनेचा राज्यातील गरजू शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा या अपेक्षेने ही माहिती पोस्ट करत आहे.
योजनेची सविस्तर माहिती खाली देत आहे.

पात्रता :

1) सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी ज्या शेतकऱ्यांकडे शाश्वत जलस्त्रोत (विहीर/बोरवेल/शेततळे)उपलब्ध आहे, असेसर्व शेतकरी पात्र राहतील. मात्र अशा शेतकऱ्यांकडे पारंपारिक पध्दतीने विद्युत जोडणी झालेली नसणे आवश्यक आहे.
2) ५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास 3 HP क्षमतेपर्यंतचे सौर कृषी पंप व ५
एकरापेक्षा जास्त शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 HP क्षमतेचा सौर कृषी पंप देय.
3) सातबाऱ्यावर विहीर/बोरवेल/शेततळे नावावर असल्याची नोंद असावी.

लाभ :

सौर कृषी पंपामध्ये मुख्यत्वे सोलर पॅनल, वॉटर पंप संच, पंप नियंत्रण उपकरणे, विहीर/ बोरवेलच्या खोलीनुसार पाईप,मोबाईल चार्जिंग व बॅटरी चार्जिंगची सुविधा, दोन डी. सी. एल. ई. डी. बल्ब यांचा समावेश.

सौर कृषिपंपाची कार्यपद्धती :

पंपाद्वारे विहीर, नदी, शेततळे, कालव्यामधून पाण्याचा उपसा करून पाइपद्वारे पिकांना पाणी देता येते. कृषिपंप सौर उर्जेवर काम करतो. जेंव्हा सूर्यकिरणे पंपाच्या सोलार पॅनल्सवर पडतात डी.सी. (डायरेक्ट करंट ) शक्ती निर्माण होऊन सौर पंप कार्यान्वित होतो.

सौर कृषि पंपाचे फायदे :

1) दिवसा पाण्याचा उपसा करता येतो.
2) विजेची आवश्यकता नाही त्यामुळे वीजबिलापासून मुक्तता.
3) डिझेल पंपाच्या तुलनेत शून्य परिचलन खर्च.

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

आवश्यक कागदपत्रे :

1) सातबारा उतारा. ( विहीर/बोरवेल/शेततळे असल्याचा उल्लेख असावा )
2) आधार कार्ड
3) जात प्रमाणपत्र ( SC/ST प्रवर्गासाठी )
4) शेजारी शेतमालकाच्या वीज जोडणीचा ग्राहक क्रमांक सोबत असावा.

(टीप : वरील मुद्दा क्र. 1, 2 व 3 मधील कागदपत्रे pdf स्वरूपात ऑनलाईन अपलोड करावयाची आहेत, ज्यासाठी pdf फाईल साईज 500 kb पेक्षा जास्त नसावी.)

वेबसाईट : https://www.mahadiscom.in/solar/#

नवीन अर्ज ऑनलाईन भरण्याची लिंक :
https://offgridagsolarpump.mahadiscom.in/AGSolarPump/AGSolarPump?uiActionName=getA1FormNEW

प्रलंबित अर्ज ऑनलाईन भरण्याची लिंक : https://offgridagsolarpump.mahadiscom.in/AGSolarPump/AGSolarPump?uiActionName=getA1FormPP

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *