सोयाबीन पिवळे होणे
नमस्कार शेतकरी मित्रानो सध्या बऱ्याच भागा मध्ये
सोयाबीन वरती अन्न द्रव्य कमतरता दिसत आहे ह्या मुळे
शेतकऱ्याचे सोयाबीन पिवळे पडणे ह्या सारखी समस्या येत आहे
काही शेतकऱ्यांन मध्ये असा गैरसमज आहे कि हा वायरस, बुरशी किवी येल्लो मोसॅक आहे.
तर शेतकरी मित्रानो तस काही हि नसून हि समस्या
अन्न द्रव्य यांच्या कमतरते मुळे येत आहे.
मुख्यतः यामध्ये झिंक, फेरस, आणी पोटॅश ची कमतरता आहे.ह्यामुळे तुमचे सोयाबीन पिवळे पडणे अशी समस्या होत आहे. हि समस्या मुख्यतः कमी किंवा जास्त पावसामुळे येते. किंवा चुनखडी युक्त जमिनी मध्ये सुद्धा हा प्रॉब्लेम येऊ शकतो.
तर हा प्राब्लेम दूर करण्या साठी तुम्ही चांगल्या गुणवत्ते चे झिंक आणी फेरस वापरावे जेणे करुन कमी कालावधी मध्ये चांगले परिणाम मिळतील. आणी आपली सोयाबीन हिरवी गार होईल.ह्या साठी शेतकरी मित्रानो खालील प्रमाणे औषधी वापरावी
झिंक एक ग्राम प्रति लिटर पाणी
फेरस एक ग्राम प्रति लिटर पाणी
तसेच एम45 दोन ग्राम प्रति लिटर पाणी
झिक तसेच फेरस हे चांगल्या कंपनी चे असायला हवे
…बळीराजा हिताय
– रोग प्रतिकारक/सहनशील वाणांची पेरणी करावी. उदा. जेएस २०-२९,
जेएस ९७-५२, जेएस २०-६९, जेएस ९५-६०
या रोगाची लागण झालेल्या शेतातील बियाणे पुढील पेरणीसाठी वापरू नये.
रस शोषक किडींपासून संरक्षणासाठी पेरणीपूर्वी बियाण्यास आंतरप्रवाही
किटकनाशकांची बीजप्रक्रिया करावी.
रोगग्रस्त झाडे उपटुन त्याचा जाळुन नाश करावा
शेतामध्ये अथवा बांधावरील तणांचा व पूरक वनस्पतींचा नाश करावा,
आंतरपिक व मिश्रपिक घेतल्यास रोगाचे प्रमाण कमी आढळते.
पिवळे चिकट सापळे पिकात हेक्टरी १० ते १२ या प्रमाणे लावावेत.
पांढ-या माशीच्या नियंत्रणाकरीता आंतरप्रवाही किटकनाशकांचा वापर करावा.
प्रादुर्भावाच्या पहिल्या अवस्थेमध्ये पिकावर थायमेथोक्झाम २५ डब्ल्यु.जी. १०० ग्रॅम प्रति हेक्टर किंवा इथोफेनप्रोक्स १ लि. प्रति हेक्टर
५०० लि. पाण्यात मिसळून फवारावे.
३) तांबेरा: C.O. Phakospora Pachyrhizi
ओळख व लक्षणे:
सोयाबीन वरील तांबेरा रोग हा प्रामुख्याने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्याच्या काही भागात आढळतो.
हा रोग बुरशीजन्य असून या रोगामुळे सुरूवातीस सोयाबीनच्या जमिनीलगतच्या पानांच्या खालच्या बाजूस
पिवळसर तांबूस ठिपके दिसून येतात आणि नंतर वरील पानांवरही दिसू लागतात.
प्रामुख्याने पानांवर तसेच काही वेळा कोवळ्या खोडावर आणि कोवळ्या शेंगांवर देखील आढळून येतो.
रोगाची तीव्रता वाढल्यास हे पिवळसर तांबूस ठिपके पानाच्या दोन्ही बाजू तसेच पानांचे देठ,फांद्यांवरही
आढळून येतात.
या ठिपक्यांमध्ये तांबूस तपकिरी रंगाची पावडर तयार होते. स्पर्श केल्यास ती हाताला चिकटते. ही पावडर
म्हणजेच तांबे-याच्या बुरशीचे बिजाणू होय,
हवामान पोषक असल्यास सर्वच पाने तांबूस होऊन मोठ्या प्रमाणात पानगळ होते. त्यामुळे शेंगामध्ये दाणे भरले जात नाहीत किंवा
बारीक, रोगट व सुरकुतलेले दाणे तयार होतात.
हा रोग हवेमार्फत पसरतो आणि थोड्याच अवधीत त्या परिसरातील सर्व पिकावर दिसून येतो.
सततचा पाऊस, ढगाळ हवामान तसेच हवेत आर्द्रता ८० टक्क्यांहून जास्त, कमी तापमान २००८ या रोगाच्या वाढीस अत्यंत अनुकूल
असते.
या रोगाचे योग्य व्यवस्थापन न केल्यास उत्पादन ५० ते ८० टक्क्यांनी कमी येऊ शकते.
पिकाच्या उन्हाळी लागवडीमुळे या रोगाची बुरशी या पिकावरुन दुस-या पिकावर उपजिविका करुन वाढत जाते आणि योग्य हवामान
मिळाल्यास त्याचा फैलाव मोठ्या प्रमाणात होतो.
रोग व्यवस्थापन: नियोजन
तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी रोग प्रतिबंधक जातीची लागवड हा एकमेव खात्रीशीर उपाय आहे.
– सध्या लागवडीसाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसित केलेली फुले कल्याणी (डि.एस.२२८) हि जात तांबेरा रोगास
कमी प्रमाणात बळी पडते या जातीवर ८ ते १० दिवस उशीरा तांबेरा येतो.
” फुले अग्रणी” (के.डी.एस ३४४) व “फुले संगम” (के.डी.एस ७२६) हे तांबेरा प्रतिकारक वाण आहेत.
ज्या भागामध्ये पाण्याची सोय आहे तेथे सोयाबीनची पेरणी लवकर म्हणजे १५ ते २५ मे च्या दरम्यान करावी, त्यामुळे पीक तांबेरा
येण्याच्या वेळेपर्यंत पक्व होते. त्यामुळे तांबे-यापासून होणारे नुकसान टाळता येते.
रोग नियंत्रणासाठी उपाय :
तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून (खालील पानावर एक किंवा दोन ठिपके ) आल्यास प्रापिकोनॅझोल (०.१० टक्के) किंवा हेक्झाकोनॅझोल
(०.१५ टक्के) या बुरशीनाशकांची स्टिकरसह ४०,६० आणि ७५ दिवसांनी आलटुन-पालटुन फवारणी करावी.
प्रापिकोनॅझोल बुरशीनाशक हातपंपाने फवारल्यास १० मिलि प्रति १० लिटर पाणी याप्रमाणात फवारावे. पेट्रोल पंपाने फवारणीसाठी
३० मिली प्रति १० लिटर पाणी या प्रमाणात वापरावे.
हेक्झाकोनॅझोलच्या फवारणीसाठी १५ मिली प्रति १० लिटर पाणी आणि पेट्रोल पंपासाठी ४० ते ४५ मिली प्रति १० लिटर पाणी या
प्रमाणात वापरावे.
४) पानावरील बुरशीजन्य ठिपके
सकोस्पोरा तसेच अल्टरनिया बुरशीच्या प्रजातीमुळे हा रोग होतो.
झाडाच्या पानावर खोडावर व शेंगावर तपकिरी रंगाचे, विशिष्ठ आकाराचे व
आकारमानाचे गडद वलय असलेले ठिपके आढळतात.
कालांतराने पानावरील ठिपक्याचा आतील भाग गळून पानाला छिद्रे पडतात.
नियोजन
पेरणी करीता निरोगी उत्तम उगवणशक्ती असलेले बियाणे पेरावे.
बियाण्यास कारबॉक्झीन + थायरम (मिश्र घटक) २-३ ग्रॅम प्रति किलो प्रमाणे
बीजप्रक्रिया करावी.
पाग्राक्लोस्त्रोबीन २०% डब्लुजी या बुरशीनाशकाची १० मिली, १० लिटर पाण्यात
मिसळून फवारणी करावी.
46-48/57
५) शेंगावरील करपा: C.O. Colletotrichum dematium
ओळख व लक्षणे:
शेंगावरचा करपा यास पॉड ब्लाईट असे म्हणतात.
कोलेटॉट्रीकम डीमॅटिम ह्या बुरशीपासून हा रोग होतो.
यामध्ये विशिष्ट असा कोणताही आकार नसलेले व मोठे होत जाणारे लालसर अथवा