Rojgarhmi yojana रोजगारहमी योजनेशी निगडित फळझाड योजना 2020

निगडित फळझाड लागवड योजना
पावसाचा लहरीपणा व राज्यातील कोरडवाहू शेतीचे प्रमाण जवळपास ८५ टक्के असल्याने शेतीवर
अवलंबून राहणाऱ्या अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांनी शेती पद्धतीत परिवर्तन घडवून आर्थिक
दुर्बलतेवर मात करावी या दृष्टीने शासन १९९०-९१ पासून रोजगार हमी योजनेशी निगडित फळ
झाडलागवड योजना राबवीत आहे. प्रत्येक वर्षी शासन या योजनेला मुदत वाढ देते.
उद्देश-Rojgarhmi yojana
शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतावर कायम स्वरूपी रोजगार निर्माण करणे.
शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होऊन त्यांचे राहणीमान उंचावणे.
जमिनीवर वनस्पतिजन्य आच्छादनाच्या अभावामुळे होणारी जमिनीची धूप कमी करणे.
• पर्यावरणाचा समतोल राखणे, तसेच लागवडी योग्य पडजमिनी फळ पिकांच्या लागवडी खाली आणणे.
शेत जमिनीची मर्यादा-कोकण विभागातील लाभधारकास किमान १० गुंठे व कमाल १० हेक्टर तर इतर
विभागांसाठी किमान २० गुंठे व कमाल ४ हेक्टर आहे.
शेतकरी निवडीचे निकष-Rojgarhmi yojana
• अनुसूचित जाती, जमाती, अल्प व अत्यल्प भूधारक त्यानंतर इतर मागास प्रवर्गातील
शेतकरी.
ज्या शेतकऱ्यांनी फलोत्पादन विकासाच्या इतर योजनांमध्ये तसेच रोजगार हमी योजनेंतर्गत
राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमांतर्गत या पूर्वीभाग घेतला असेल तर त्यांचे पूर्वीचे क्षेत्र
गृहीत धरून शेतकऱ्यांना हेक्टर मध्ये ठरवून दिलेल्या क्षेत्राच्या मर्यादेत या योजनेचा लाभ
दिला जाणार आहे. मात्र या लाभार्थीची पूर्वीची लागवड यशस्वी झालेली असणे गरजेचे आहे.
• विश्वस्त कायद्यातील संस्था, सहकारी कायद्या खालील संस्था यांच्यासाठी क्षेत्राची कमाल
मर्यादा १० हेक्टर आहे. सहकारी साखरकारखाने व सूत गिरण्या यांना या योजनेतून
वगळण्यात आले आहे.
लाभधारकाने जर तो संयुक्त खातेदार असेल तर सातबाराच्या उताऱ्यावर नोंदणीनुसार त्यांच्या
हिश्शाचे क्षेत्राचे प्रमाणात लाभ देण्यात येईल.

अनुदान-Rojgarhmi yojana
बागायत व कोरडवाहू क्षेत्रात मोडणाऱ्या व सातबारावर फळबागेची नोंद असलेल्या
शेतकऱ्यांनाच या योजनेत अनुदान दिले जाते. ते जिवंत फळझाडाच्या प्रमाणानुसार दिले
जाते. हे अनुदान एकूण तीन वर्षांत दिले जाते. यातील पहिल्या वर्षी ५० टक्के दिले जाते,
दुसऱ्या वर्षी ३० टक्के व तिसऱ्या वर्षी २० टक्के अनुदान शेतकऱ्यांना दिले जाते. मात्र दुसऱ्या
व तिसऱ्या वर्षाच्या अनुदानासाठी शेतकऱ्यांची दुसऱ्या वर्षी ७५ टक्के व तिसऱ्या वर्षी ९० टक्के
फळझाडे जिवंत असणे गरजेचे आहे.
कार्यक्रमांतर्गत लावावयाची फळ झाडे-
कोरडवाहू पिके – आंबा, काजू, बोर,सीताफळ, आवळा, चिंच, फणस, कोकम, जांभूळ,
कवठ, चीरोळी, जोजोबा, बांबू, जट्रोफा
• बागायती पिके – नारळ, संत्रा, मोसंबी,चिकू, डाळिंब, पेरू, अंजीर, कागदी लिंबू, सुपारी
तेलताड, रबर, पानपिंपरी
नारळ बागेत आंतर पिके
• मसाला पिके – मिरी, लवंग, जायफळ,दालचिनी, सुपारी,
भात खाचराच्या बांधावरील लागवड -आंबा, काजू, पेरू, नारळ, आवळा
• औषधी सुगंधी वनस्पती – आइरन, अर्जुना, असन, अशोक, बेल, गुग्गुळ, लोध्रा,
रक्तचंदन, शिवण, टेटू, बेहडा, बिब्बा, डिकेमाली, हिरडा, रिठा, वावडिंग, करंज

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *