Shelipaln / शेळीपालन व्यवसाय संपूर्ण माहिती, शेळीची निवड

शेळीची निवड Shelipaln
• बाजारातून शेळी खरेदी करताना, एक जानकार व्यक्ती सोबत असावा
• पहीले एकदा सर्व बाजार फिरून विक्रीसाठी आलेल्या सर्व शेळ्या निट बघून घ्याव्यात.
• त्यापैकी चांगल्या जातीच्या शेळ्यांची जुळ्या पिल्लासोबत निट पारखून निवड करावी.
.शेळीचे वय, पिल्लांचे वय व शेळीची दचधाची क्षमता यांच अवलोकण करावे
शेळी कींवा पिल्ले आजारी नसल्याची खात्री करावी
•पिल्ले त्याच शेळीचे आहेत याची खात्री करावी.
• गाभण शेळी करताना वय, गर्भाची अवस्था, सडातून येणारा स्त्राव व सर्वसाधारण आरोग्य
बघावे
• बाजारात चाललेल्या व्यवहारावरून किमतीचा अंदाज घ्यावा
जुळ्या पिल्लांसहीत आलेल्या शेळी व पिल्ले यांचे वजन, आक्रषकता व निरोगीपणा यांच
अवलोकन करून मग किंमतीचा अंदाज घेउन बोलणीला सुरवात करावी.
• किमतीत घासाघीस करून, शक्य तेवढी किंमत कमी करून खरेदी करावी.

‘जुळ्या पिल्लांसहीत शेळी खरेदी
करण्याचा फायदा म्हणजे पुढील 4 ते
5 महिन्यात पिल्ले विक्रीसाठी तयार
होतात, त्यामुळे 5 व्या महीन्यापासूनच
शेळीपालनात उत्पन्न चालू होते’
शेळीपालन व्यवसायातील यशाचे रहस्य – • जातीवंत शेळ्यांचा कळप • पोटभर सुका चारा • 250 ग्राम
खुराक • शुध्द पाणी • शेळी व करडांचे डेली निरीक्षण • लसीकरण • बाजार व ग्राहवर्ग संपुर्ण माहिती
व्यावसायीक नफा मिळवून देणाऱ्या

http://aamchinaukri.com/central-command-recruitment/

शेळीची निवड
शेळी जुळ्या पिल्लांसहीत विकत घेतल्याचा मिळणारा फायदा-
• शेळी जुळ्या पिल्लांसोबत घेतली तर आपणास त्यांच्या जुळी पिल्ले देण्याच्या
अनुवंशिकतेची खात्री मिळते
• शेळी जुळ्या पिल्लांसोबत असल्यास, पिल्लांचे वजन, उंची, चपळता, अंगाची चमक बघुन
आपल्याला शेळीची जात, दुध क्षमता, पैदाशिसाठी वापरलेला बोकडयाबद्दलखात्री करून
घेता येते

Shelipaln

• पिल्लांच्या सद्य स्थीतीवरून शेळी कीती जातवंत आहे हे पडताळता येते व आपले
जातीवंत शेळींचा कळप बणविण्याचे उद्दिष्ट पुर्ण करायला मदत मिळते
•सुरवातीलाचजातीवंत कळप तयार झाल्यास, नंतर शेळ्या लवकर बदलन्याची गरजपडत
नाही व आपले भविष्यातील मोठे नुकसान टाळता येते
• शेळी पिल्लांसोबत असल्यामुळे परराज्यातून आणलेली शेळीपन शेड वर लगेच रूळून
जाते व लवकर पुढील प्रजननासाठी तयार होते
• सर्वात मोठा फायदा म्हणजे, ही पिल्ले जातीवंत असल्यामुळे, त्यांची जलद वजनवाढ,
आकर्षकपणा व जातीचे गुणधर्म यामुळे ही पिल्ले नविन शेळीपालकाना ब्रिडींगसाठी विकून
आपला शेळ्या खरेदी वर झालेला खर्च तुम्ही पहील्या 3-4 महीन्यात वसुल करू शकता.
• तुम्ही शेळी व2 पिल्ले खरेदी करण्यासाठी मोजलेली रक्कम ही दोन पिल्ले तुम्हाला
देउन जाईल व तुमची भांडवल रक्कम मोकळी होइल आणि हाच शेळीपालनातील खरा

शेळी व करडांची खरेदी साठी
योग्य बाजाराची निवड Shelipaln
वरील सर्व गोष्टींची पुर्तता झाल्यावर बाजारांची माहीती व निरीक्षण –
• आपल्याला कमी किमतीत निरोगी शेळ्या व निरोगी व जलद वजनवाढ होणारी जुळी
करडे निवडायची आहेत
• तुमच्या फार्म च्या 50 कि.मी. च्या क्षेत्रातील स्थानीक बाजार व बाजार दिवस माहित
करून प्रत्येक बाजारात फिरून निरीक्षण करा
• विक्री साठी आलेल्या शेळ्या व जुळ्या करडांची जात, वय, वयाच्या मानाने वजनवाढ,
आरोग्य व किम्मत यांचा अंदाज घ्या.
• खाटकांच व व्यापाऱ्यांच निरीक्षण करा, स्वस्तात शेळ्या व करडे खरेदि करण्यासाठी
ती लोक कशाप्रमाणे व्यवहार करतात ते बघा, ती लोक विकणाऱ्याने सांगीतलेल्या
किमतीपेक्षा निम्म्या किमतीपासुन व्यवहाराला सुरवात करतात
• त्यांच्या सर्व व्यवहारांचे निरीक्षण करा व कमी किमतीत शेळी व जुळी करडे कशी
खरेदी करायची ते शिका
• अश्या 8-10 स्थानिक बाजारांचे निरीक्षण करून जिथे कमी कीमतीत चांगली जातीवंत
शेळ्या व करडे मिळतात असे बाजार निवडा
शेळीपालन व्यवसायातील यशाचे रहस्य – • जातीवंत शेळ्यांचा कळप • पोटभर सुका चारा • 250 ग्राम खुराक •
शुध्द पाणी • शेळी व करडांचे डेली निरीक्षण • लसीकरण • बाजार व ग्राहवर्ग संपुर्ण माहिती
बाजारात जातीवंत शेळ्या व जुळ्या
करडांची खरेदी
बाजारात-
• कमी किंमतीत शेळी व जुळ्या करडाची खरेदी – जास्त नफा, लक्षात आहे ना ।
• बाजाराला जाताना साधे कपडे घाला कारण आपला भारीतला पेहराव बघून किंमत
वाढण्याची शक्यता असते
• बाजाराला जाण्यापुर्वी बारीक दोर व शेळ्या व करडांना मार्कीग करायला खडू
बरोबर ठेवा
• पहाटे लवकर पोहचा व बाजाराच्या बाहेर च उभे राहुन जे शेळीपालक, शेतकरी
शेळी व करडे विकायला येतील त्याच्यांकडून करडे खरेदी करा
• योग्य व निरोगी शेळ्यांची लक्षणे लक्षात ठेवा
• जुळ्या पिल्लांसहीत शेळी विकत घ्या
• करडे सांभाळायला एक दोन लोक बरोबर असू द्या
• व्यापाऱ्याकडून खरेदी टाळा
• घाई मुळीच करू नका, शांततेत व व्यापाऱ्यांच्या दबावाला बळी न पडता खरेदी करा
• गर्दीत पैसै पन व्यवस्थित सांभाळा
• बरोबर गाडी असेल तर करडे गाडीत
ठेवा
शेळीपालन व्यवसायातील यशाचे रहस्य – • जातीवंत शेळ्यांचा कळप • पोटभर सुका चारा • 250 ग्राम खुराक •
शुध्द पाणी • शेळी व करडांचे डेली निरीक्षण • लसीकरण • बाजार व ग्राहवर्ग संपुर्ण माहिती

ही पण बातमी वाचा थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

 रोगमुक्त शेळीपालन व जलद
वजनवाढीसाठी संपुर्ण आहार व्यवस्थापन
चारा व खुराक व्यवसथापन
मित्रानो , आधुनिक शेळीपालन व्यवसायात सर्वात महत्वाचा टप्पा 60/157 चांगल्या प्रजनन साठी व करडांच्या जलद वजनवाढीसाठीचा संपुर्ण
शेळीपालनात जो नफा मिळणार आहे तो फक्त आणि फक्त करडांच्या जलद
वजनवाढीवरच मिळणार आहे.
आतापर्यंत जीतके गोटफार्म व बोकडफार्म बंद झाले आहेत त्या सर्वांच बंद होण्यामागच
कारण म्हणजे रोगमुक्त शेळीपालन व जलद वजनवाढीच्या संपुर्ण आहाराबद्दल असलेल
अपुर्ण ज्ञान !
आपन कधी विचार केलाय का की निसर्गाने शेळ्यांच्या जाती अशाच भागात जन्माला का
घातल्या जीथे दुष्काळ असतो किंवा जीथे सुका चारा व झाडपल्यावरच शेळ्या पाळल्या
जातात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हिरवा चारा ऊपलब्ध नसतानाही या दुष्काळी
भागातील शेळ्या आपल्या वजनवाढ, दुध व प्रजनन क्षमतेसाठी प्रसीध्द आहेत.
उदा-
शिरोही , सोजत – राजस्थानचा वाळवंटी भाग
उस्मानाबादि – सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी भाग
बीटल- पंजाब राज्यातील वाळवंटी भाग
कोटा, जमुनापरी- उत्तर प्रदेश चा दुष्काळी भाग
संगमनेरी- नगर जिल्ह्यातील दुष्काळी भाग
बेरारी – विदर्भातील दुष्काळी भाग
शेळीपालन व्यवसायातील यशाचे रहस्य – • जातीवंत शेळ्यांचा कळप • पोटभर सुका चारा • 250 ग्राम खुराक •
शुध्द पाणी • शेळी व करडांचे डेली निरीक्षण • लसीकरण • बाजार व ग्राहवर्ग संपुर्ण माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *