घरच्या घरी तयार करा बियाणे आणि बियाणे परीक्षण biyane

घरच्याघरी बियाणे biyane परीक्षण
१. घरच्याघरी उपलब्ध असलेले बियाणे पेरणीसाठी वापरतांना उत्पादन वाढीसाठी
बियाण्यांची उगवणक्षमता, शुद्धता, इतर जातींची व वाणाची भेसळ, रोगट किंवा
फुटके बियाणे याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
२. योग्य काळजी न घेता घरचे बियाणे पेरणीसाठी वापरल्यास त्याची उगवण चांगली
होत नाही आणि त्यामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीबरोबर पेरणीचा हंगामसुद्धा
वाया जाण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी चांगल्या प्रतीचेच बियाणे पेरणीसाठी
वापरले पाहिजे.
3. बियाण्याची उगवण क्षमता :
आपल्या घरचे बियाणे biyane वापरण्यापूर्वी घरच्या घरी त्यांची उगवणक्षमता
तपासूनच बियाणे पेरण्यायोग्य आहे कि नाही हे ठरवावे. उगवणक्षमता
तपासणीसाठी वापरणार असणाऱ्या बियाण्यांवर कुठलीही प्रक्रिया केलेली नसावी
तसेच त्यामधील काडी कचरा,खराब दाणे साफ करून घ्यावे.
१. उगवणक्षमता तपासणी करिता बियाण्याचे प्रतिनिधित्व करणारा नमुना तयार
करून घ्यावा. नमुना हा आपण वापरणार असलेल्या सर्व बियाण्यांचे
प्रतिनिधित्व करणारा असणे आवश्यक आहे. त्याकरिता नमुना घेण्याकरिता
विशेष काळजी घ्यावी. प्रत्येक पोत्यामधून खोलवर हात टाकून मुठभर बियाणे biyane
काढावे. सर्व पोत्यातील काढलेले बियाणे चांगले एकत्रित करून नमुना तयार
करून घ्यावा.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई

२. कमीत
कमी साहित्यात घरच्याघरी प्राथमिक स्वरुपात बियाण्यांची
उगवणक्षमता
आपण तपासून पाहू शकतो. त्यासाठी सर्व बियाण्यांचे
प्रतिनिधित्व करणाऱ्या नमुण्या मधून उगवणक्षमता तपासण्याकरिता ४०० दाणे
घ्यावेत. दाणे घेतांना निवडून न घेता सरसकट घ्यावे. १०० दाण्यांचा एक या
प्रकारे ४ भाग करावेत. आपण ४ ऐवजी ३ भाग हि करू शकता. परंतु अधिक
अचूकतेसाठी साठी ४ भाग करणे जास्त योग्य आहे.
. ४ मातीच्या कुंडीत अथवा निचरा होईल असे छीद्र करून प्लास्टिकच्या ट्रे मध्ये
ज्या शेतात पेरणी करावयाची आहे तेथील माती व थोडे शेणखत मिश्रण करून
मसाले मलगा । मगर .भरावे. पाणी देऊन कुंड्या | ट्रे तयार करून घ्यावेत. उपलब्ध असल्यास माती

http://aamchinaukri.com/msc-bank/

ऐवजी बारीक रेती चा देखील उपयोग केला जाऊ शकतो. साधारण 0.0५ मिमी
ते 0.८0 मिमी दरम्यानच्या आकारची निर्जंतुक केलेली रेती घ्यावी. अर्धात
जाड रेती न घेता तांदूळ/गहू गाळणीच्या चाळणीतून पडेल अशी बारीक रेती
घ्यावी. निर्जंतुक करण्याकरिता रेती चाळून धुऊन दोन ते तीन दिवस कडक
उन्हात सुकवावी. रेतीचा वापर केल्यास मुळांचे परीक्षण करणे अधिक सोपे
होईल.
. दुसऱ्या दिवशी ४ भाग केलेले प्रत्येकी १०० बियाणे ४ कुंड्या / ट्रे मध्ये पेरावेत.
उगवणक्षमता तपासण्याकरिता पेरतांणा साधारण बियाण्याच्या आकाराच्या
कमीत कमी ५ पट अंतर दोन बियाण्यात ठेवावे. माती पूर्ण ओली होईल
इतकेच पाणी द्यावे. पेरणी करतांना साधारण शेतात पेरतो त्याच खोलीवर
पेरावे. खूप वर अथवा खोल पेरू नये. सर्व बियाणे एकाच खोलीवर पेरले
जातील यांची काळजी घ्यावी. रेती चा वापर केला असल्यास रेतीतील आद्रता
वरच्यावर आवश्यकते नुसार पाणी देऊन टिकवून ठेवावी लागेल.
५. मातीच्या । रेतीच्या भरलेल्या कुंड्या अथवा ट्रे ऐवजी पातळ गोणपाटाच्या ।
बारदाण्याच्या आयताकृती तुकड्यांचा देखील वापर करता येऊ शकतो. पातळ
गोणपाटाचे आयताकृती तुकडे (साधारण १ फुट X १.५ फुट) हे टॉवेल पेपर
सारखे वापरावे. एक ओला केलेल्या पातळ गोणपाटाच्या तुकड्यावर १० बियाणे
एका ओळीत अशा प्रकारे १०० बियाण्याची मांडणी करावी. त्यावर दुसरा पातळ
ओला गोणपाटाचा तुकडा अंथरावा. बियाण्यासाहित गोणपाटाची गोल गुंढाळी
करून त्याला रबर लाऊन घ्यावे. असे चार नमुने करून एखाद्या ट्रे मध्ये उभे
करून थंड जागी जिथे दिवसा प्रकाश असतो अश्या ठिकाणी ठेवावे.
गोणपाटाचे कापड पूर्णपणे कोरडे होणार नाही तसेच अति पाणी राहणार नाही
याची दक्षता घ्यावी लागेल. जुने, रोगिष्ट धान्य साठवणुकी करीता वापरलेले
गोणपाट वापरले तर बियाण्यांनवर रोगाचा प्रादुर्भाव होऊन योग्य उगवणक्षमता
समजणार नाही, त्याकरिता नवीन गोणपाटाचे तुकडे निर्जंतुक करून वापरावे.
तसेच गोणपाटाचे तुकडे वापरणार असल्यास अधिक पाणी होऊन बियाणे सडणार नाही यावर लक्ष द्यावे.
. अशा पेरलेल्या बियाण्याला सुमारे ८ ते १० दिवसात चांगले कोंब निघतात.किती कोंब निघाले हे प्रथमता मोजून घ्यावेत. त्यावरुन ४ नमुन्यांची सरासरी

काढून चाचणी केलेल्या बियाण्याची उगवणशक्तीची टक्केवारी काढावी. हि टक्केवारी प्राथमिक स्वरुपात उगवणक्षमतेचा अंदाज देते.
७. अधिक परीक्षणाकरिता कोंब मोजून झाल्यावर कुंड्या । ट्रे यांना अधिक
प्रमाणात पाणी देऊन माती/ रेती यातील रोपे मोकळी करून, मुळांना इजा न
पोहचवता धुऊन बाहेर काढावीत. तसेच गोणपाट वापरला असेल तर गुंढाळी
उघडून रोपांचे निरीक्षण करावे. रोपांची ‘चांगले’ आणि ‘विकृत’ रोपे अशी
विभागणी करावी. त्या व्यतिरिक्त काही बियाणे न उगवता सडून जातात
अथवा टणक राहतात. रेती अथवा गोणपाट वापरल्यास निरीक्षण अधिक चांगले
करता येते.
८. उगवणक्षमता चांगली असणारे रोपे मोजण्याकरिता ज्या रोपांची वाढ योग्य
दिसत आहे, कोंब व मूळ कुजलेले अथवा खुंटलेले नाहीत, मुळांची वाढ चांगली
होऊन त्यावर तंतूमुळे वाढलेली आहेत अशी रोपे घ्यावी. व्यवस्थित वाढलेले
रोपे परंतु ज्यांच्या मुळांची वाढ खुरटलेली आहे पण कुजलेली / खुंटलेली नाही
अशी रोपे सुद्धा चांगली रोपे म्हणून मोजावी.
९. विकृत रोपे, सडलेले बि, कठीण टणक बि हे मोजणीत घेऊ नये. कोंब व मूळ
कुजलेले । खुंटलेले अथवा इजा पोचलेले असले तर ती रोपे विकृत म्हणून
समजावी. परंतु मुंग उडीद या पिकात कठीण टणक बि हे देखील मोजणीत
घ्यावे. तसेच बियाण्यांशी निगडित बुरशीचा प्रादुर्भाव असल्यास रोपे कुजण्याच्या
अवस्थेत असतात. हि रोपे देखील मोजणीत घेऊ नये.
१०. विकृत रोपे अनुकूल परिस्थितीतसुद्धा व्यवस्थित वाढू शकत नाहीत आणि पूर्ण
झाडांमध्ये वाढ होण्याची त्यांची क्षमता व जोम हा खूप कमी असतो. तसेच
सडलेले बि हे बऱ्याचदा पोकळ, किडलेले आणि गर्भ नसलेले असर ळे
3/4
अशी रोपे व बि मोजणीत घेऊ नये.
११. बियाण्याची उगवणशक्ती हि प्रमाणित उगवण क्षमतेपेक्षा अधिक असेल तर ते
बियाणे पेरण्यास योग्य आहे.
१२. तसेच सोयाबीन सारखे पिकात बीज हे अधिक संवेदनशील आहे. साठवणुक व
हाताळणी दरम्यान तापमान आणि हवेतील आद्रतेचा बियाण्याचा उगवण
क्षमतेवर परिणाम होतो. त्याकरिता उगवण क्षमतेची चाचणी पेरणीच्या एक
अथवा दोन आठवडे पूर्वी करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *